Articles by निलेश बामणे
संस्कारांची टोपी…
समाज नेहमीच संस्कारांची टोपी फक्त स्रीयांच्याच डोक्यावर ठेवत आला आणि पुरुषांना मोकाट सोडत आला आता ती टोपी पुरुषांच्याही डोक्यावर ठेवायला हवी ! तरच समाजातील बलात्कार आणि स्त्रियांवरील अत्याचार कमी होतील आपणही संस्काराची टोपी आपल्या डोक्यावर स्वत: ठेवून घेऊया ! […]
स्त्री- मुक्ती…
आता तिच्या आणि माझ्या प्रेमाच भविष्य कोणाच्या हातात आहे ? डबक्याच्या, डबक्यातील पाण्याच्या , सूर्याच्या की पावसाच्या ? ती ज्या डबक्यात आहे ते डबकं म्हणजे प्रेम आहे त्या डबक्यातील पाणी म्हणजे जीवन आहे आणि सूर्य म्हणजे जीवनातील समस्या आहेत आणि पाऊस म्हणजे जगण्यातील मोह आहे. या डबक्याच्या बाहेर मी जेथे आहे ती एक पोकळी आहे अर्थशून्य जगण्या मारण्या पलीकडील ! जगाच्या दृष्टीने मी जिवंत आहे पण मी कधीच मेलोय! ज्या दिवशी ती त्या डबक्यातून बाहेर येईल माझ्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यावर तो दिवस तिच्याच काय संपूर्ण स्त्री जातीच्या मुक्तीचा दिवस असेल….स्त्री मुक्तीचा दिवस असेल … […]
श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा होऊ नये !
त्याची पत्रिका मी माझ्या पद्धतीने पाहिल्यावर माझ्या लक्षात आले त्याचा जन्म सत्तावीस नक्षत्रातील सर्वात विषारी समजल्या जाणाऱ्या आश्लेषा नक्षत्रात झालेला होता त्यामुळेच त्याच्यावर हे आकस्मित संकट ओढावले होते त्याला निमित्त मात्र त्याच्या वडिलांचे बिडी पिणे आणि त्यामुळे झालेला कर्करोग होता भविष्य कोणालाही टाळता अथवा बदलता येत नाही ज्योतिष शास्त्रामुळे फक्त त्याचा अंदाज घेता येऊ शकतो इतकंच … […]
माझ्या कल्पनेतील विमान…
माझ्या स्वप्नातील विमान जमिनीवर स्थिरावताच माझ्यातील माणुसकीही क्षणात मेली होती… © कवी – निलेश बामणे […]
मोठं होणं म्हणजे नक्की काय असतं ?
मोठं होण म्हणजे नक्की काय असतं ? माझा बाप म्हणतो… लग्न कर ! पोर काढ ! मग कळेल तुला मोठं होणं म्हणजे नक्की काय असतं… मी मनात म्हणतो बापाला… तुम्ही आम्हालाच काढलं नसत तर झालाच नसता ताप तुम्हाला मला आणि आता जगाला… लोक पोरं काढण्यासाठी लग्न करतात किती हा मूर्खपणा ? ती तर लग्न न करताही […]
तू…
तू कोणाची का होईना तुझ्या हृदयातील एक जागा मोकळी राहायलाच हवी… मी जिवंत असेपर्यत तुला माझी आठवण यायलाच हवी … मला गमावल्याची किंमत तुला काळायलाच हवी … माझ्या समोर येता तुझी नजर झुकायलाच हवी… तुझ्या आयुष्यात एकदा तू माझी मदत मागायलाच हवी… माझे सर्वस्व पणाला लावून मी ती तुला करायलाच हवी… कवी – निलेश बामणे, ( […]
वेदना…
मी काल दिलेल्या वेदना आज भोगतोय… मला आज दिलेल्या वेदना तू उद्या भोगशील… वेदनांचा हा जमाखर्च आता असाच सुरु राहणार… चेहऱ्यावर हसू असणार आणि हृदय जळत राहणार… शरीर झिजत जाणार मन तरुणच राहणार… शरीर नष्ट होणार पण वेदना तशीच राहणार… वेदनेचे गणित पुन्हा कोणी दुसरे मांडणार… या जगात शेवटी वेदना वेदनाच राहणार… – निलेश बामणे ( […]