नवीन लेखन...
Avatar
About निलेश बामणे
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

प्रसिद्धी

वर्तमानकाळात उभा राहून भूतकाळ आणि भविष्यकाळ मी दोन्ही पाहतोय… भूतकाळ बरा होता , भविष्यात मी स्वतः च स्वतःला शोधतोय… मोहाच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलोय… त्या ढिगाऱ्यावर ती बसलेय माझी प्रसिद्धी ! माझ्या प्रेयसीचा हात हातात घेऊन… मी प्रेमाची शिक्षा भोगतोय आतल्या आत गुदमरतोय… निलेश बामणे ( बी डी एन )

धागा

तू काय ? ती काय ? मी काय ? सारेच एका माळेचे मणी वेगवेगळ्या रंगाचे एकाच धाग्यात गुंफलेले कोणी आधी गुंफलेले कोणी नंतर धागा तुटता सारेच पसरलेले अपघाने दोन मणी जवळ येतात हलकासा वारा येताच विलग होण्यासाठी … ©निलेश बामणे

स्वप्ने

तुझी स्वप्ने तू जग माझी स्वप्ने मी जगतो भेटूच आपण एकदा स्वप्नांचा हिशेब मांडायला सारखी स्वप्ने वजा करू उरलेली मिळून पूर्ण करू ©निलेश बामणे

भुंगा

त्यानेच घातला भुंगा डोक्यात माझ्या तिच्या प्रेमात पडण्याचा… स्वतःच्या पायावर स्वतः च्या हाताने धोंडा मारून घेण्याचा… सभोवताली असताना मादक पऱ्या तिच्या प्रेमात पडण्याचा… मनात नसतांना तिच्या काही तिच्यात गुंतून पडण्याचा… आला योग जीवनात माझ्या प्रेमाची शिक्षा भोगण्याचा… कवी – निलेश बामणे ( बी डी एन )

त्याची मर्जी

काडीही हलत नाही त्याच्या मर्जीशिवाय आणि मी जग बदलू पाहतोय ! काडी हलण्यालाही वारा निमित्त असतो आणि मी स्वतःला बदलू पाहतोय ! मी शांत आणि स्थिर राहतो तो माझी परीक्षा घेऊ पाहतोय ! माझे प्रेम आणि तिचे प्रेम एकत्र करू पाहतोय! त्याची मर्जी मी स्वीकारताना आता तो पाहतोय ! कवी – निलेश बामणे ( बी डी […]

माझ्या कविता

माझ्या कविता वाचून माझ्या प्रेमात पडू नकोस विचार मला त्या कवितेतील प्रत्येक ओळींचा अर्थ… माझ्या कवितेची प्रत्येक ओळ आहे एक प्रेम मंत्र जीवनातील एक रहस्य न सुटलेल्या साऱ्या कोड्यांचं उत्तर… प्रेमात पडणं सोप्प असत पण जगण अवघड ते अवघड सोप्प कस करायचं ते सांगते ती माझी कविता… म्हणून माझ्या कविता वाचून माझ्या प्रेमात पडू नकोस माझ्या […]

तुझ्या प्रेमात…

तुझ्या प्रेमात पडण्यापूर्वीही मी जगत होतो आनंदात तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी जगत आहे भ्रमात कळत नाही माझेच मला मी काय पाहतोय स्वप्नात उगाच विचार करतो आता मी आध्यात्मचा भौतिक जगात माझे सारे जग आता मी पुन्हा नव्याने पाहतोय कित्येक वर्षानंतर नव्याने मी तुझ्या प्रेमात पडतोय माझा मलाच आता मी पुन्हा नव्याने शोधतोय प्रेमाच्या मृगजळास आता मी […]

मी आणि तू !

मी त्याग केला माझ्या सुखांचा आनंदाचा आणि प्रेमाचाही फक्त जगासाठी… त्या त्यागाची जगात किंमत शून्य… तू आशेचा किरण होतीस या स्वार्थी जगात माझ्यासाठी… देवालाही साकडे घातले मी फक्त तुझ्यासाठी वाटते आहे आता देवावरही लागेल प्रश्नचिन्ह… कवी – निलेश बामणे ( बी डी एन )

कविता…

मी प्रेमात पडलो की फक्त कविता लिहतो पप्रेमाच्या नशेत… नशा उतरल्यावर तिच्या प्रेमाची त्या एकदा वाचून बघतो… तेव्हा मला कळत मी नशेतही बराच शुद्धीत असतो… माझा प्रेमभंग झाल्यावरही मी फक्त कविताच लिहतो… पण तेव्हा मी पूर्ण शुद्धीत असतो… माझ्या कविता सतत वाचणाऱ्यानां माझं प्रेमात पडणं कधीच कळत नाही पण माझा प्रेमभंग मात्र लगेच कळतो… माझ्या कविता […]

भ्रम

मी बाहेर आलोय आता भ्रमातून… आता पाहीन मी जगाकडे फक्त माझ्या चष्म्यातून… आता कोणी सुटणार नाही माझ्या चाणाक्ष नजरेतून… माझे मौन मी आता कायमचे सोडणार आहे… गमावलेल्या प्रत्येक गोष्टीची आता किंमत लावणार आहे… प्रत्येक दिवस आता फक्त माझा असणार आहे… माझे प्रत्येक पाऊल आता यशावर पडणार आहे… मिळविण्यासाठी जे जे असते ते मी मिळविणार आहे… प्रत्येक […]

1 12 13 14 15 16 43
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..