नवीन लेखन...
Avatar
About निलेश बामणे
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

बदनाम

सितेसाठीच रामालाही आज बदनाम केले आहे श्रीकृष्णाला गोपिकांनीच आज बदनाम केले आहे लक्ष्मीनेच तर सरस्वतीसही आज बदनाम केले आहे महाभारता द्रोपदीनेच आज बदनाम केले आहे देवांनाही इंद्राने त्या आज बदनाम केले आहे कलियुगाने माणसालाच आज बदनाम केले आहे ©निलेश बामणे

पाऊस

दुष्काळानंतरचा पाऊसगारवा देणारा असतो, प्रेयसीने प्रियकराच्याजखमेवर प्रेमाने फुंकर घालावी तसा… तापलेली जमिन पावसानेथंड झाल्यावर आनंदाने हिरवा शालू नेसते, साखरपुड्यात नववधू नेसतेतसा… सृष्टीचे हे बदलेले रूपशेतकरी डोळेभरून पाहातो, प्रियकर आपल्याप्रेयसीचे अप्रतीम सौंदर्य चोरून पाहातो तसा… शेतकर्‍याच्यास्वप्नांना पावसात नवीन पालवी फुटून तो आनंदी होतो, प्रेयसीशीच लग्नठरल्यावर प्रियकर होतो तसा… ©निलेश बामणे

बलात्कार…

बलात्काराच्या बातम्या वाचल्या की लाज वाटते … आपण पुरुष असल्याची… त्या षंढांमुळे पुरुष बदनाम होतो… प्रत्येक पुरुष स्त्रियांच्या नजरेत दोषी दिसतो… प्रत्येक पुरुष लबाड असतो पण षंढ नसतो… तिच्या रक्षणासाठी कित्येकदा तो आपल्या प्रणाचीही बाजी लावतो… ती मिळविण्यासाठी असतानाही तिला मिळविण्याचा प्रयत्न करतो… तिला पाहून पुरुष उत्तेजित होतही असेल पण बेभान होतोच असे नाही… पुरुषाच्या मिठीत […]

तुझ्यात जीव रंगला…

तुझ्यात जीव रंगला… पाहता पाहता तिच्यात गुंतला… शहरातील हायवे वरून अचानक शेतात घुसला… विमान सोडून बैलगाडीला भुलला… मातीला न स्पर्षणारा मातीत लोळला… पांढरपेशा अचानक गावरान झाला… स्वप्न जगणारा आता स्वप्नात रंगला… प्रेमापासून पळणारा प्रेमात पडला… कवी – निलेश बामणे

चष्मा…

तिच्या फाटलेल्या, फाडलेल्या अथवा फाडून घेतलेल्या जीन्समधून तिच्या गोऱ्या मांडया दिसत होत्या… पुरुषांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या पण त्या नजरेत वासना नव्हती एक प्रश्न होता… हिला भीक लागलेय की भिकेचे डोहाळे लागलेत… फक्त गोंदलेल गोंदण दिसावं म्हणून ती काय काय दाखवत होती…न बोललेलं बर … मग म्हणणार पुरुषांच्या नजरेत वासना आहे… मला वाटत पुरुषांनी आपल्या डोळ्यावर […]

चित्र

मी एक चित्र काढले होते माझ्या भविष्याचे… त्यात रंग ही भरणार होतो मनासारखे… पण ते चित्र नियतीने फाडले… मग मी चित्रच काढणे सोडले… रंग सारे माझ्यासाठी बेरंग झाले… आता फाटलेले चित्र जोडायचे आहे… पण कोणाला ? ज्यांनी ते फाडले आहे… आता ते चित्र जोडून काय कामाचे… ते चित्रही आता भूतकाळ झाले आहे… माझ्या भविष्याचे चित्र आता […]

तू…

तू दूर गेल्यावरच तुझी आठवण येते जितके अंतर वाढते तितकेच प्रेम वाढते तू जवळ असताना मनात काहीच नसते पण लांब असताना सारेच चलबिचल असते तुझ्या माझ्यात काहीच कधी सारखे नसते तरी तुझे सारे काही मला आवडते माझे मन जपण्यासाठी तू आटापिटा करतेस सारे समजून उमजूनही बोलणे टाळतेस प्रेमात पडायला काय लागते हे सांगतेस पण प्रेम व्यक्त […]

आपले प्रेम …

बऱ्याचदा वाटलं तुला सांगावं माझं तुझ्यावर प्रेम आहे ? पण तुझे ? न सुटलेले कोडे आहे ? तू जमीन तर मी आभाळ आहे… आपल्या मिळण्यासाठी मी क्षितिजाच्या शोधात आहे … तसे एक क्षितिज आता सापडलेही आहे… पण जितके त्याच्या जवळ जावे तितके ते दूर जाते आहे… माझ्या हृदयाचे आभाळ चांदण्यांनी व्यापले आहे… मनात एक चंद्र ही […]

कविता…

एका तासात केलेली कविता…लोकांना आवडते एका दिवसात केलेली कविता…डोक्यावरून जाते एका महिन्यात केलेली कविता…कविता वाटते एका वर्षात केलेली कविता…कविताच नसते एका आयुष्यात केलेली कविता…जीवन असते एका तासात केलेली कविता…मला आवडते एका दिवसात केलेली कविता तिला आवडते एका महिन्यात केलेली कविता…त्यांना आवडते एका वर्षात केलेली कविता…कवितेलाच आवडते एका आयुष्यात केलेली कविता…मृत्यूला आवडते मृत्यूला आवडणारी कविता प्रेम कविताच […]

तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी माझ्या मेंदूला कंप सुटतात हृदयात वेदना रोज होतात… तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी माझे डोळे अश्रूंनी ओलावतात माझी स्वप्ने सारी भंगतात… तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी माझे दिवस वाया जातात माझे विचार स्वैर होतात… तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी माझ्या क्षणांचे तास होतात माझ्या जगण्याचे बारा वाजतात कवी – निलेश बामणे ( एन. डी.)

1 15 16 17 18 19 43
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..