नवीन लेखन...
Avatar
About निलेश बामणे
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

होळी…

होळी रे होळी ! पुरणाची पोळी ! ही आरोळी हल्ली तितकीशी ऐकायला मिळत नाही म्हणून आपल्या संस्कृतीतील होळीचे महत्व कमी झालेले आहे असे मानण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रात खास करून कोकणात होळी या उत्सवाला असाधारण महत्व आहे. होळी हा सण त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. होळी हा एकमेव सण आहे जो कोकणातील लोकांच्या उत्साहाचा प्रतीक […]

आय लव्ह यु …

विजय ! एक  सर्वसामान्य दिसणारा माणूस एका बऱ्यापैकी महाग असणाऱ्या हॉटेलात कोणीतरी येण्याची वाट पहात झुरका मारत चहा पित असतो पण  कपाने ! बशीने चहा पिणे त्याच्या गावातच नव्हते. गरम गरम चहाचा कप तो मिनिटात रिकामा करत असे पण येथे वेळ काढायचा होता म्हणून तो थेंब थेंब चहा पीत होता. चहा पिता पिता आजूबाजूचेच नव्हे तर […]

देव आणि मी…

आपण माणसे हजारो वर्षापासून फक्त देवावर विश्वास ठेऊन जगत आलो. पण खरंच देव असं काही अस्तित्वात आहे का ? हा प्रश्न मला मी अगदी लहान असल्यापासून भेडसावतो ! आज आजूबाजूला जेव्हा मी करोडो रुपये खर्चून लोक देवाची मंदिरे बांधण्याचा अट्टहास करताना दिसतात तेव्हा त्याची कीव येते . स्वतःला समाजाचे सेवक म्हणवून घेणारे नेतेही यांच्यात मागे नाहीत. […]

वर्तुळ…

सकाळी मोकळ्या रस्त्यावरून चालताना विजय कविताला म्हणतो,’ मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे ! ‘ ते ऐकून दोघेही एका झाडाखाली थांबतात… कविता: ( त्याच्याकडे पहात) हा ! बोला ना ! बऱ्याच दिवसापासून मला जाणवतंय कि तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे ! विजय: ( किंचित सावरत कविताचा हात हातात घेत ) कविता ! आय लव्ह यु […]

माझ्या चारोळ्या …

आकाशाला भिडणारे प्रेम आता कानाला भिडले हृदयात शिरणारे प्रेम मोबाईल मध्ये घुसले… मला मोठे व्हायचे होते पण फक्त तिच्या नजरेत मोठा झालो मी जगासाठी पण नालायक तिच्या नजरेत.. माझ्या चारोळ्या वाचा सहन करू नका नाही आवडल्या तरी छान म्हणू नका… वाटत नाही कोणाला मी प्रेमवेडा आहे… कारण प्रेमाने मला बोलताच येत नाही… माझी कविता रोज तरुण […]

माझ्या चारोळ्या …

माझ्या चारोळ्या … उगाच समजू नका मी प्रेमवेडा आहे प्रेम कशाशी खातात मला ठाऊक आहे … प्रत्येक वर्षी संकल्प करतो फक्त तिच्याच प्रेमात पडण्याचा वर्ष संपता संकल्प असतो ती सोडून प्रेमात पडण्याचा… तुझ्या प्रेमात पडल्यापासून माझा शीघ्रकवी झाला फेसबुकवर माझ्या कवितांचा पाऊस सुरु झाला… आजही तुझी आठवण येता मला स्वतः वर हसू येते पण स्वतःवर हसत […]

माझ्या चारोळ्या…

उगाच समजू नका मी प्रेमवेडा आहे प्रेम कशाशी खातात मला ठाऊक आहे … प्रत्येक वर्षी संकल्प करतो फक्त तिच्याच प्रेमात पडण्याचा वर्ष संपता संकल्प असतो ती सोडून प्रेमात पडण्याचा तुझ्या प्रेमात पडल्यापासून माझा शीघ्रकवी झाला फेसबुकवर माझ्या कवितांचा पाऊस सुरु झाला आजही तुझी आठवण येता मला स्वतः वर हसू येते पण स्वतःवर हसत असताना मला तुझी […]

चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६

चारकोप, मुंबई येथे रविवार दि. १८ डिसेंबर २०१६ रोजी नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६ प्रचंड कवींच्या सहभागाने अत्यंत जल्लोषात पार पडले. सादर महाकाव्यसम्मेलनाचे महाकाव्यसंमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी व गीतकार प्रा.प्रविण दवणे होते. काळी 9.30 वा. नवनिर्माण मराठी ग्रंथालय ते महाकाव्यसंमेलन स्थळापर्यंत भव्य काव्यग्रंथ दिंडीचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्या दिंडीत अंदाजे […]

तुझ्यात जीव रंगला…

तुझ्यात जीव रंगला… पाहता पाहता तिच्यात गुंतला… शहरातील हायवे वरून अचानक शेतात घुसला… विमान सोडून बैलगाडीला भुलला… मातीला न स्पर्षणारा मातीत लोळला… पांढरपेशा अचानक गावरान झाला… स्वप्न जगणारा आता स्वप्नात रंगला… प्रेमापासून पळणारा प्रेमात पडला…   कवी – निलेश बामणे

1 17 18 19 20 21 43
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..