नवीन लेखन...
Avatar
About निलेश बामणे
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

भोक

तुझ्या भिंतीवर मारला खिळा आणि पडला भोक तिला… त्या भोकातून पाहिले तुला पण दिसला चंद्र मला… त्या भोकाला लावला डोळा तेंव्हा दिसला काळोख मला… त्या भोकातूनच मग भिडला तुझ्या डोळ्याला माझा डोळा… त्या भोकातून पाहिले तुला तुही मग पाहिले मला… त्या भोकावर टांगले मला तुही मग टांगलेस तुला… त्या भोकातून दिले तुला तुही दिले प्रेम मला… […]

थोबडा

तुझा थोबडा पाहून मी तुझ्या प्रेमात पडलोच नाही तुला पाहून माझ्या हृद्याचे ठोके चुकले पहिल्यांदाच… मला वाटते तुझे आणि माझे काही नाते असावे गतजन्मीचे पण ते नाते प्रेमाचे नाही तर कदाचित असावे शत्रूत्वाचेच कारण क्षणात माणसांना भुरळ घालणार्‍या मला तुझ्या मागे उगाचच धावत राहावे लागलेच नसते वर्षानुवर्षे वेड्यागत… © कवी – निलेश बामणे ( एन.डी.)

डेटींगचे अड्डे तर झालेले नाहीत ना ?

लग्न जुळविणे हा हल्ली एक धंदा झालेला आहे. लग्न जुळविण्याच्या नावाखाली कित्येकांनी पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढलेले आहेत. सध्या लग्न जुळविणारी, मंडळे, संस्था, वेबसाइट्स यांना पेव फुटला आहे. या अशा लग्न जुळविणार्‍या सर्व माध्यमांची मदत घेऊनही जर एखाद्याचे दोन-तीन वर्षे लग्न जुळत नसेल तर वेगवेगळ्या पन्नास व्यक्तींना भेटून त्यांनी नक्की काय साध्य केलेले असतं ? […]

धर्म आणि दहशतवाद…

दहशतवादी हल्ल्यात अमुक अमुक देशात तमुक तमुक माणसे मरली गेली या अशा आशयाच्या बातम्या आता नित्याच्या झालेल्या आहेत. आपल्या मराठीत म्ह्णच आहे ना ‘रोज मरे त्याला कोण रडे’ तसेच काहीसे या दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत झालेले आहे. फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकही आता या बाबतीत उदासिन झालेले असावेत. सध्याच्या युगातील माणसे मला वाटत आपला जीव […]

झोपडी ते टॉवर

माझ्या झोपडीच्या जागी झाला टॉवर अन्‍ वाढली आता माझी पॉवर… लिफ्टने आता मी होणार लिफ्ट गरिबीतून श्रीमंतीत अचानक झालो शिफ्ट… टॉयलेटमधे मी आता बसणार इंग्लिश इंग्रजीबद्दल मनात नाही आता किल्मिश… चुरगळले कपडे आता होणार हद्दपार सुटबुट भरजरी आता अंगावर चढणार… एस.आर.ए. ने केले झोपडपट्टीचे टॉवर मलाही दिले माझ्या स्वप्नातील शॉवर… मुंबई होणार आता झोपडी मुक्त उरलेल्या […]

व्यसनाधिनता आणि ती…

व्यसनांच्या दिशेने जर स्त्रियांची पावले वळ्त असतील तर त्यांना वेळीच आवर घालावा लागेल अन्यता आपल्या समाजाचं, देशाचं, आपल्या देशातील भावी पिढीचं आणि पर्यायाने स्त्रियांच भविष्यही धोक्यात येईल. त्याहूनही दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे गुन्हेगारी आणि व्यसनाधिनता यांचा फारच जवळ्चा संबंध असतो त्यामुळे गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. […]

जग

मी म्हणालो जगाला मला फक्त तुझ्यासाठी आणि स्वतःसाठी जगायचयं… जग म्हणालं मला माझ्यासाठी जगं पण टाळं स्वतःसाठी जगायचं… मी बदललो जगाच्या कल्याणासाठी पण आता जगचं मला बदलतयं… जगात बदल घडवणं आता अशक्य आहे कारण जग आता पाषाण झालयं… © कवी – निलेश बामणे ( एन.डी.) दिनांक – 9 मार्च 2016

घटस्फोट आणि भारतीय संस्कार…

आपल्या देशात हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढू लागलयं हा कित्येकांसाठी चिंतनाचा आणि चिंतेचा विषय ठरू लागलेला आहे. आपल्या देशातील हे वाढतं घटस्फोटाचं प्रमाण दिवसेन- दिवस वाढतच जाणार आहे त्यामुळे भविष्यात आपल्या देशातील घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल या भ्रमात कोणीच राहाता कामा नये आणि ते प्रमाण कमी व्हाव म्ह्णून प्रयत्न करणे म्ह्णजे उंठावरून शेळ्या हाकण्यासारखे आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या […]

लग्न म्हणजे काय असतं ?

लग्न म्हणजे काय असतं ? एक चुकलेलं गणित असतं कारण तिथे एक आणि एक तीन असतं… लग्न म्हणजे काय असतं ? उगाच त्याग करणं असतं कारण त्यातून काहीतरी मिळवायचं असतं लग्न म्हणजे काय असतं ? दोन जीवांचं मिलन असतं कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं लग्न म्हणजे काय असतं ? मोक्षाकडे नेणारं दार असतं कारण […]

तू भेटलीस की…

तू भेटलीस की का बेचैन होते वेडे मन माझे… तू भेटलीस की का होतात डोळे ओलेचिंब माझे… तू भेटलीस की का काळीज होते कासाविस माझे… तू भेटलीस की का व्यर्थच भासे हे जीवन माझे… तू भेटलीस की का बेभान होते सारेच ग माझे… © कवी – निलेश बामणे ( एन.डी.) दिनांक – 9 मार्च 2016

1 19 20 21 22 23 43
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..