नवीन लेखन...
Avatar
About निलेश बामणे
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

लग्न म्हणजे काय असतं ?

लग्न म्हणजे काय असतं ? एक चुकलेलं गणित असतं कारण तिथे एक आणि एक तीन असतं… लग्न म्हणजे काय असतं ? उगाच त्याग करणं असतं कारण त्यातून काहीतरी मिळवायचं असतं लग्न म्हणजे काय असतं ? दोन जीवांचं मिलन असतं कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं लग्न म्हणजे काय असतं ? मोक्षाकडे नेणारं दार असतं कारण […]

तू भेटलीस की…

तू भेटलीस की का बेचैन होते वेडे मन माझे… तू भेटलीस की का होतात डोळे ओलेचिंब माझे… तू भेटलीस की का काळीज होते कासाविस माझे… तू भेटलीस की का व्यर्थच भासे हे जीवन माझे… तू भेटलीस की का बेभान होते सारेच ग माझे… © कवी – निलेश बामणे ( एन.डी.) दिनांक – 9 मार्च 2016

माझा जन्म

माझाच जन्म व्हावा म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं… माझ्या जन्माचं कोडं त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं… माझा जन्म आता मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं… मला शक्य असतं तर या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं… किती बरं झालं असतं या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं… © […]

जागतिक महिला दिन

झालाही असेल कदाचित जन्म एका स्त्रिचा पुरूषापासून पण विश्वातील तो एक पुरूष सोडला तर समग्र पुरूष जातीला जन्म स्त्रियांनीच दिला… स्त्रिला जन्म देताना पुरूषाला वेदना झाल्या असतील – नसतील ही पण पुरूषांना जन्म देताना स्त्रियांना होणार्‍या वेदना पुरूष वर्षानुवर्षे पाहतच आला… स्त्रियांनी पुरूषांना फक्त जन्मच दिला नाही तर खायला दाणा, राहायला आसरा, प्रेम, जिव्हाळा आणि संस्कारही […]

महाशिवरात्री

शिवापासून वेगळा झालेला जीव पुन्हा शिवात विलीन होण्यापर्यंतचा काळ म्ह्णजे जीवन… पण जीव रमतो जगण्यातील मजा लुटण्यात आणि गुंतून पडतो असंख्य मोहात… शिवाला विसरलेल्या जीवाला पुन्हा शिवाकडे वळविण्यासाठीच कदाचित युगानुयुगे साजरी केली जातेय महाशिवरात्री आपल्या संस्कृतीत… कवी- निलेश बामणे

मराठी माय माझी…

मराठी राजभाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा! मराठी माय माझी… मराठी माय माझी… ममतेचा करते वर्षाव मजवरी… मराठी माय माझी… ममतेने करते संस्कार मजवरी… मराठी माय माझी… ममतेने मला शिकवण देणारी… मराठी माय माझी… ममतेने मला वळण लावणारी… मराठी माय माझी… ममतेने माझ्या आवडी जपणारी… मराठी माय माझी… ममतेने माझ्या कला जोपासणारी… मराठी माय माझी… […]

चूक

विजय कोणत्यातरी कामात व्यस्थ होता इतक्यात त्याचा फोन खणखणला, पलिकडून त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाने जो स्वतःला त्याचा मित्र म्ह्णवून घ्यायचा पण विजयने ज्याला आपला मित्र कधीच मानला नव्हता, खंर म्ह्णजे ! विजयची जी मैत्रीची व्याख्या होती त्या व्याख्येत तो दूरपर्यंत कोठेही बसत नव्हता. त्याने विजयला प्रश्न केला,’ कोठे आहेस ? उत्तरादाखल विजय म्ह्णाला,’’ आहे इकडे ! […]

ई-साहित्य संमेलन – मनोगत

रेणुका आर्ट खुले ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या साहित्य संमेलनात माझा सहभाग लक्षनिय होता पण दुसर्‍या साहित्य संमेलनात मनात असतानाही सहभागी होणे मला शक्य झाले नव्हते. पण तेंव्हाच तिसर्‍या साहित्य संमेलनात आपला सहभाग असायलाच हवा असं मी मनाशी पक्क ठरवलं होत. त्यामुळे या तिसर्‍या ई-साहित्य संमेलनातील काही उपक्रमात मी सहभागी झालो. खरं म्ह्णजे […]

कथा माझ्या अपयशाची…

मी शाळेत असताना मला माझ्या समवयस्क मित्रांसोबत पैंजा लावून त्या जिंकण्याची वाईट सवय होती. एकदा चक्क मी माझ्या एका मित्रासोबत नववीला असताना एका मुलीला पटविण्याची पैंज लावली. ती मुलगी कोणी साधी-सुधी मुलगी नव्ह्ती. अष्टपैलू मुलगी होती. शाळेतील सर्वच गोष्टीत तिचा नंबर पहिला होता. अशा एक नंबर असणार्‍या मुलीला पटविण्यासाठी आपल्यालाही काहीतरी वेगळं करावं लागणार असा विचार […]

1 20 21 22 23 24 43
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..