शिल्पा
त्या दिवशी सकाळी – सकाळी कोणीतरी गेल्याची बातमी कानावर आली. ती कुजबुज ऐकण्यासाठी मी झोपेतच माझे कान टवकारले असता दोन दिवसापुर्वी शिल्पा गेल्याची बातमी कळ्ली. शिल्पा कोणी लहान मुलगी नव्ह्ती पंच्चविशीतील एक विवाहित स्त्री होती. आमच्या चाळीतील लहान- थोर सारेच तिला प्रेमाने शिल्पा या एकेरी नावानेच हाक मारत. मी व्यक्तीशः तिला फारसा ओळखतही नव्ह्तो कारण खासकरून […]