निवडणुका आणि मतदार…
पुर्वीचा प्रत्येक राजकारणी आपल्या पक्षाशी, त्या पक्षाच्या विचारांशी आणि तत्वाशी शक्यतो एकनिष्ठ असायचा पण आता तो कपडे बदलावे तसे पक्ष बदलतो आणि नोकरीचा राजिनामा द्यावा तसा पक्षाचा राजिनामा देतो. पुर्वी मतदारांचा एक विशिष्ठ वर्ग कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि तो कोणत्या पक्षाला मतदान करेल याचे अचूक अंदाज बांधता यायचे आता तसे ते बांधणे शक्य न राहिल्यामुळेच राजकीय भविष्य खोटी ठरतात आणि राजकीय गणित मांडणार्यां चाही गोंधळ उडतो.
[…]