एक परीस स्पर्श ( भाग – ५०)
काही दिवसापूर्वी विजयने एका किर्तनात एक कथा ऐकली ती कथा अशी होती की एका गावात एक मोठे साधू महाराज येतात.. त्या गावातील लोक खूपच धार्मिक असतात ते त्या साधूना लोक वर्गणीतून एक आश्रम बांधून देतात .. त्यावर ते साधू महाराज मानत विचार करतात या गावाने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्या उपकाराची परतफेड आपल्याला करायला हवी म्हणून ते त्या गावकऱ्यांना सांगतात तुम्ही मला तुमच्या गावातील पन्नास विद्यार्थी द्या मी त्या पन्नास विद्यार्थ्यांना दोन वर्षे शिकवून ज्ञानी करेन त्याप्रमाणे गावकरी ४९ विद्यार्थी जमा करतात पण एक विद्यार्थी कमी पडत असतो. त्या गावात एक मुलगा असतो तो फक्त खात असतो आणि झोपत असतो. गावकरी विचार करतात ५० वा विद्यार्थी म्हणून ह्याला पाठवू या ! घरी झोपा काढतो त्या ऐवजी तेथे जाऊन झोपा काढेल. ठरल्याप्रमाणे ते साधू त्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करतात तो ५० वा विद्यार्थी आपल्या सवयी प्रमाणे मागे भिंतीला टेकून झोपा काढत असतो. हा ! हा ! म्हणता एक वर्ष होते .. साधू महाराज त्या मागे बसलेल्या ५० व्या विद्यार्थ्याला उठवून पुढे आणून बसवायला सांगतात आणि सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणतात,” एक गॊष्ट लक्षात ठेवा ! ईश्वर चराचर आहे … […]