लबाड पुरूष
तू ! तू तुझं पावित्र्यही जपलेस आणि मर्यादाही पाळल्यास! तुझं जीवन हे एका तपस्वी माणसाच जीवन आहे. तुला हंव ते ते तू साध्य करून घेऊ शकतोस पण तू स्वतःच्या गरजांना मर्यादा घातलीस ! तुझ्यावर प्रेम असणार्यात सर्वांच्या आयुष्याच सोनं झालं. त्यांच्या सुखा समाधानासाठी तू नेहमीच देवाकडे प्रार्थना केलीस. तू सर्वसामान्य माणूस नाहीस हे तुलाहीमाहित आहे आणि मलाही .प्रतिभासह तू जो प्रवास केलास त्यामागे निश्चितच काहीतरी कारण होतं.
[…]