अपेक्षांच्या ओझ्याखाली
एखाद्या मुलीची प्रेमप्रकरणे, लग्नापूर्वी त्यातील एखाद्याशी आलेले तिचे शारीरिक संबंध आणि एकूणच तिचा प्रेमाकडे खेळ म्ह्णून पाहण्याचा स्वभाव तिच्या होणार्या् नवर्या पासून त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी जाणिव पूर्वक लपविणे हा गुन्हा नाही का ? असल्यास त्यासाठी कायद्यात काही शिक्षेची तरतूद आहे की नाही ? या भानगडीत न पडता आपण या गोष्टीकडे जरा डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करायला हवा ! पूर्वी बर्या चदा मुलच प्रेमाच्या बाबतीत मुलींची फसवणूक करायचे पण आता त्यात मुलीही मागे राहिलेल्या नाहीत. मांजर कशी उंदराला खेळवते तशा काही मुली मुलांना खेळ्वतात, त्यांच मानसिक खच्चीकरण करून त्यांना व्यसनाधिन बनवितात हे सत्य आहे पचायला किती ही जड असल तरी. […]