Articles by निलेश बामणे
बलात्कार
बलात्काराच्या बातम्या हल्ली कानी पडतात वारंवार … पुरुषात आजही दडलाय लांडगा हे सिद्ध होतंय वारंवार … पुरुषातील पुरुषत्वच घेतोय बळी राक्षसासारखा स्त्रीचा वारंवार … पुरुष असल्याची लाजही वाटते वाचून बातम्या बलात्काराच्या वारंवार … हातही शिवशिवतात घेण्यास घोट बलात्कारी पुरुषांच्या नरडीचा वारंवार … स्त्रियांनीच का उभा चिरू नये अशा बलात्कारी पुरुषास असेही वाटते वारंवार … स्त्री – […]
आणखी एक बॉम्बस्फोट
आणखी एक बॉम्बस्फोट
शांततेच काळीज चिरून गेला
पुन्हा एकदा निरपराध्यांच रक्त चाखून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
सर्वसामान्यांची झोप उडवून गेला
संपूर्ण देशात भयाच सावट पसरवून गेलां
आणखी एक बॉम्बस्फोट
पुन्हा तोच प्रश्न विचारून गेला
ज्याच उत्तर देण्यापूर्वी ईश्वरही झोपी गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
मानवतेला काळिमा फासून गेला
डोळ्यातील अश्रुनैवजी रक्त गोठवून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
डोक बधिर करून गेलां
जीवनात जगण्याची खात्री नाही हे पटवून गेला
कवी – निलेश बामणे
[…]