एक परीस स्पर्श ( भाग – २५ )
विजयला बुटाचे आकर्षण लहानपणापासून होते. विजय कमवायला लागल्यावर त्याने कधी स्लीपर फार घातली नाही.मग ती कितीही महागातली का असेना ? गोव्यावरून विजयने आणलेली स्लीपर त्याने कारखान्यात काम करताना वापरली. […]
विजयला बुटाचे आकर्षण लहानपणापासून होते. विजय कमवायला लागल्यावर त्याने कधी स्लीपर फार घातली नाही.मग ती कितीही महागातली का असेना ? गोव्यावरून विजयने आणलेली स्लीपर त्याने कारखान्यात काम करताना वापरली. […]
याबाबतीत मात्र विजय पूर्वीही बदनाम होता आणि आज ही कितीही सुंदर आणि गोड आवाज असणाऱ्या तरुणीने त्याला फोन केला तरी तो तिच्याशी अधिकचा एक शब्दही बोलत नाही. पण एखादी समोरा – समोर भेटली आणि तिची बोलण्याची इच्छा असेल तर तो थांबतही नाही. […]
आज विजयचा पाय प्रचंड दुखत होता. त्यात मरणाच्या थंडीमुळे अधिकच त्रास होत होता. पायात थोडी सुजही होती. शरीरातील सर्व सांध्यात थोड्या थोड्या वेदना जाणवत होत्या. कशामुळे काय दुखतंय तेच कळत नव्हतं. त्यामुळे विजय लांब पाय करून खुर्चीत बसला होता. […]
जयेशच्या वडिलांची म्हणजे जयराम शेठची कथा जी आपण नंतर सांगणार होतो…ती सांगतो…. […]
आज विजय बस स्टॉपवर उभा होता. तोच त्याची नजर रस्त्याच्या कडेला नारळाच्या झावळ्यांपासून झाडू बनविणाऱ्या स्त्री पुरुष आणि लहान मुलांकडे गेले. तर एक मुलगी तीन दगडांच्या चुलीवर चहा बनवत होती. चहा बनविण्यात ती खूपच एकाग्र झाली होती. ते पाहून विजयला त्याचे बालपणीचे दिवस आठवले! त्याची आई अशीच चुलीवर चहा बनवत असे आणि विजय बटर घेऊन तिच्या बाजूला बसलेला असे. […]
आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे विजय सूक्ष्म निरीक्षण करत असल्यामुळे त्याला कळले की बऱ्याचदा त्याच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी घडतात आणि त्याच्यावर येणारे संकट टळते. कारण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी देवाला नाही तर आपल्या प्रारब्धाला गृहीत धरले. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी विनाकारण घडत नाहीत यावर विजयचा आजही विश्वास आहे म्हणूनच तो कोणत्याही परिस्थिती स्थिर असतो. […]
दिव्या आणि विजयची भेट एका पतपेढीत झाली होती. आणि ती विजयच्या बाबांच्या ओळखीची होती. विजयच्या आयुष्यात आलेली ती सर्वात बिनधास्त मुलगी होती. म्हणजे कोणा मुलासोबत बोलताना आपल्याला कोणी पाहिलं तर वगैरेची तिला अजिबात चिंता नव्हती. […]
मेनका त्याच्या आयुष्यात आलेली एकमेक मुलगी होती. जी त्याची सच्ची मैत्रीण आणि प्रेयसी होती. विजयला माहित होते की तिचे त्याच्यावर प्रेम आहे पण तिला माहित नव्हते की विजयचेही तिच्यावर प्रेम होते. मेनका जर स्वतःच्या तोंडाने म्हणाली असती की तिचे त्याच्यावर प्रेम आहे! तर विजयने नक्कीच तिच्याशी विवाह केला असता. पण ती व्यक्त झाली नाही आणि विजयला […]
काल कित्येक वर्षानंतर विजयने पुन्हा हातात रंग आणि ब्रश घेतला. त्याच्या पुतणीला एक चित्र काढून हवं होतं. पण विजयचा हात आता पूर्वीसारखा वळण घेत नव्हता. पूर्वी तो चित्र काढताना त्याला खोडरबर क्वचितच वापरावा लागत असे. […]
विजयच अभिनयाचं वेड त्याच्या घरच्यांना आवडत नव्हतं. म्हणून ! नाहीतर आज तो अभिनयाच्या क्षेत्रात नक्कीच एका उंचीवर असता. त्याने एक व्यावसायिक नाटक लिहिले होते. त्या नाटकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात झाला होता, तेंव्हा विजय आणि त्याचे पाच सहा मित्र ते नाटक पाहायला गेले होते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions