नवीन लेखन...
डॉ. नीतिन आरेकर
About डॉ. नीतिन आरेकर
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

आधुनिक युगाचा विश्वकर्मा : नितीन चंद्रकांत देसाई

काही पुस्तके देखणी दिसतात, पण त्यात आशयघनता नसते. काही पुस्तके आशयघन असतात पण त्यांच्यात देखणेपणा नसतो. मराठी साहित्याच्या प्रांतात तर ही स्थिती नेहमीच आढळते. परंतु, ही उणीव दूर करणारे एक नवे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे, ते म्हणजे ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’, लेखक मंदार जोशी. […]

ज्ञानेश्वरी, अध्याय ६ ओवी ८०

जगणे ही मोठी आनंदयात्रा आहे. पण ह्या आनंदयात्रेचा वारकरी असणारा माणूस मात्र शुभ अशुभाच्या कल्पनांच्या ओझ्याखाली दबून जात असतो. या सर्व कल्पना निर्माण कोणी के्ल्या याचा आपण विचार करत नाही.
[…]

बालगंधर्व

मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर एकूण भारतीय चित्रपटसृष्टीतच दर्जेदार चरित्रपटांची वानवा आहे. शंभर वर्षांची परंपरा सांगणार्‍या भारतीय चित्रपटसृष्टीला खरं तर अशोभनीय अशी ही बाब आहे. परंतु, ही बाब ठळकपणे जाणवून देणारी एक आशादायक घटना म्हणजे ‘“बालगंधर्व”’ हा चित्रपट!
[…]

कलाकार

त्या भर उन्हात कर्जतच्या बाजारपेठेनं एका अस्सल कलावंताचा अभूतपूर्व असा उत्स्फूर्त आविष्कार पाहिला. त्या कलावंताला नव्हतं भान बाजारपेठेचं, तिथल्या गर्दीचं, नव्हतं भान कशाचं! तो नव्हता यशवंत दत्त, तर त्या क्षणी तो होता – अप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट! […]

हॅप्पी दिवाळी!!

सोनू, अगं उठ, आज दिवाळी, अशी उशीरा उठून कसं चालेल? आज लवकर उठायचं, पहाटे पहाटे अंगाला उटणं लावून गरम गरम पाण्यानं आंघोळ करायचा दिवस. हो, रोज जरी तू आंघोळ करत असलीस तरीही, आजची गोष्टच वेगळी. त्यात आज आपण लोकांना शुभेच्छा द्यायला जायचंय, हॅप्पी दिवाली असं म्हणायचंय. असं, काय करतेस, तुला मी शिवसेना किंवा मनसे चा अजेंडा उचलायला सांगितला नाहीये, आपण दिवाळीच्या शुभेच्छा, असं संकुचित मराठीत बोलायचं नाही, आपण धेडगुजरी समाजात रहात असल्याने, आपण हॅप्पी दिवाली असंच म्हणायचं!! चल आटप लवकर. आपण थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जाऊ या मुंबईला. […]

मेघमल्हार. . .

आज त्यांना कदाचित हा प्रसंग आठवणारही नाही. खरं आहे, अमृतवर्षावाला थोडंच माहित असतं, की, अमृत कुठं कुठं साडतं आहे. पण तो वर्षाव, त्या कणांना टिपण्याचं भाग्य लाभलेल्या आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्याला अमृतमय करतो!! […]

हसू!

हसणं. किती साधी, सोपी कृती! पण कित्येकदा आपण ती विसरून जातो. कधी कधी तर आपल्याला आपण हसलो तर आपली प्रतिष्ठा हरवते की काय असे वाटते. […]

यतीन कार्येकर ते औरंगजेब : एक अद्भूत प्रवास

यतीन कार्येकर, एक अत्यंत संवेदनशील, तरल, अंडरप्ले करणारा जातिवंत अभिनेता. कोणतीही भूमिका त्याला द्या, त्या भूमिकेचे तो सोनेच करणार! मुन्नाभाई एम् बी बी एस् मधला तोंडातून एकही शब्द बाहेर न काढता त्या बडबड्या चित्रपटात स्वतःच्या अभिनयाची आगळी छाप सोडून जाणारी आनंदभाईची भूमिका जगणारा सच्चा कलावंत. थरारमधला चिकित्सक, शोधक, खराखुरा वाटणारा इन्स्पेक्टर कर्णिक साकारणारा नटवर्य तर वयाच्या तिशीतच साठीतला कामेश महादेवन साकारणारा रंगकर्मी. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..