Articles by डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
ताण-तणावांचे विषाणू
ताण-तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण-तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण-तणावांना काही देणे-घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे. […]
मेल्टिंग पॉट की सॅलड बाउल ?
….. एकेकाळी यालाच आपण “एकत्र कुटुंबपद्धती ” म्हणत होतो आणि हळूहळू त्या पॉटमधील नातं वितळत गेल्यामुळे (अजूनही माझ्या बघण्यात काही सन्माननीय अपवाद आहेत) आता ती “विभक्त कुटुंब पद्धती” झालीय आणि अविभाज्यपणे जीवनपद्धती म्हणून स्वीकारली गेली आहे. सगळी छोटीछोटी घरे म्हणजे सॅलड बाउल्स ! […]
‘दि कश्मीर फाईल्स’ – सत्य ‘खरं’ असतं !
“इंफोटेंमेंट” सदरातील चित्रकृतीने त्या चौकटीबाहेर जाऊन समोर धरलेला आरसा विद्रुप आणि असह्य होता. मल्टिप्लेक्सच्या थंडगार अंधारात हे साधं बघणंही अस्वस्थ करणारं होतं आणि बजाज स्कुटर /गॅस सिलेंडर मुळे वैतागणाऱ्या मला त्या मंडळींच्या जागी स्वतःला इमॅजिन करणेही अशक्य होतं. […]
रिडेव्हलपमेंट (पुनर्निर्मिती? पुनर्विकास?)
आपले दिवस सरले तेव्हा गाशा गुंडाळलेला बरा, असं त्या वाड्याला वाटत असेल कां ? भर डेक्कनवर, चव्हाट्यावर आपलं वय झाल्याचं वर्तमान प्रसिद्ध केल्याबद्दल संकोच, किंचित उद्वेग आणि बराचसा राग त्या वास्तूच्या मनात आला असेल कां ? किंवा ” मेकअप ” मुळे आपण अधिक तरुण, चित्ताकर्षक, लोभस दिसणार म्हणून आतून नवी हिरवाई जाणवत असणार कां ? […]
कृतज्ञता
कृतज्ञता ही कदाचित एकमेव अशी भावना असेल जिचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव येतोच पण ती अभावानेच व्यक्त होते. एकतर आपण इतरांना गृहीत धरत असतो आणि त्यात काय मोठं? ते त्या व्यक्तीचं कामच आहे. त्यासाठी त्याला पगार मिळतो, मग वेगळं कौतुक /कृतज्ञता यांची गरज काय? किंवा आपण बर्याच गोष्टींवर आपला हक्क मानत असतो. अशावेळी या ना त्या कारणाने कृतज्ञता राहूनच जाते. […]
बोल मेरे साथिया (ललकार)
१९७२ च्या भुसावळमध्ये अमरदीप टॉकीज ला प्रीमियर रिलीज झालेला हा चित्रपट (खरं तर युद्धपट!) सकाळी सहापासूनचे शो! धर्मेंद्र,राजेंद्र आणि माला सिन्हा ! अवचित हे गाणं भेटलं आणि भिडलं. ” जितनी सागर की गहराई , जितनी अंबर की उंचाई ” अशी प्रेमाची ग्वाही देणारं ! […]