Articles by डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
दिवंगत आत्मीय बाबासाहेब पुरंदरेंची आठवण !
त्या दिवशीचा नाट्यानुभव (दृक् -श्राव्य) तोही मोकळ्या मैदानात महानाट्याच्या रूपात आमच्या नातीसाठी नवा होता. वयाच्या पाचव्या वर्षी लावणी – कव्वाली , अभंग ,ओव्या, भजन, भारूड, पोवाडा या श्रीमंत परंपरा तिला एका छताखाली भेटल्या. बुरुज होता पण हिरकणीला ती शोधत राहिली. गोष्टींमध्ये ऐकलेली बरीचशी पात्रं तिला अनुभवायला मिळाली. तिने वेळोवेळी ताल धरून दिलेली दाद आम्हीं उभयता एन्जॉय करीत होतो. […]
खरं तर मी हे करू शकतो/ते
जीवन ही एक सुंदर भेटवस्तू आहे , त्यामुळे आयुष्य गृहीत धरू नका. काहीवेळा मनासारखे होणार नाही मात्र तुम्हाला पेलणार नाही असे आव्हान तुमच्या कधी वाटयाला येणार नाही. ही आव्हानेच तुम्हाला अधिक ताकतवर बनवतील. […]
माणसांना उभे करणारे शब्द !
” शब्दांचा हा खेळ मांडला ” असं मागणं मांडणाऱ्या महानोरांनी ” तुझा शब्द दे आकाशाचा ” असं ईश्वराला विनवलं आहे. देशभक्तीपर गाण्यांमध्ये, पोवाड्यांमध्ये ऊर्जा असते ती जीवनाला ध्येय देणारी, दिशा दाखविणारी ! अशा शब्दांचे ऋण मानताना, माझ्या आवडत्या दोन ओळी – […]
हरवले आहेत…. !
माणसे मुळात हरवतात का? ती हरवतात म्हणजे नेमके काय होत असते? आणि हरवण्याच्या (जगाच्या दृष्टीने) कालावधीत ही मंडळी कोठे असतात आणि काय करीत असतात? अशी हरवलेली मंडळी खरंच सापडतात का? असतील तर त्याचे पोस्टर का लागत नाही ?- ” सापडले “म्हणून ! शोधाशोध थांबली याचा आनंद नको का? एक वर्तुळ पूर्ण झाले. […]
निर्मितीचे हात आणि दुरुस्तीचे हात !
सर्जनाला अनेक हात लागतात. कलाकृतीची निर्मिती अनेक हातांपासून संपन्न होते. पण बरेचदा हे निर्मितीचे हात अदृश्य असतात. काहीतरी नवं तयार करणं यासाठी दैवी घटक तर लागतातच पण मानवी मदतही तितकीच गरजेची असते. […]
‘झी’ चा अगोचरपणा !
काल दुपारी दोनच्या सुमारास झी टीव्ही च्या दोन वेगवेगळ्या चॅनेल्सने अगोचरपणा केला. एकाचवेळी एकाच थीम वर आधारीत दोन चित्रपट सुरु केले. एका चॅनेलवर ” मेहबुबा “- खन्ना आणि हेमा वाला ! […]
जीवनाची गुणवत्ता!
१९५० पासून जीवनाची गुणवत्ता आणि त्याची मोजदाद याबाबत मानसशास्त्रात विचारमंथन सुरु आहे. प्रत्यक्षात २००३ मध्ये जॉन फ्लॅनागन या अमेरिकन मानस शास्त्रज्ञाने एक प्रश्नावली सुचवली. समाधान, आयुष्यावरील नियंत्रणाची भावना, सहभाग, बांधिलकी (वचनबद्धता), दैनंदिन जीवनात कामाचा समतोल इत्यादी घटकांबाबत एखाद्याचे व्यक्तिगत आकलन काय आहे, मूल्यांकन काय आहे हे घटक जीवनाची गुणवत्ता मोजण्याच्या प्रक्रियेत महत्वाचे ठरतात. […]
सतत DOING व्हर्सेस काहीवेळ BEING !
सारखे DOING करत असू तर दिवसातील काहीवेळ तरी BEING साठी आपण राखून ठेवतो का? याचं कारण असं की आपणांस आसपास आवाजाची, गोंधळाची इतकी सवय झाली असते की थोडावेळ जरी शांतता असली तर आपण दचकतो/भांबावतो. आजूबाजूला काही नसेल तर आपल्याला कसंनुसं होतं. कामातून बाहेर पडून या शांततेला कवटाळलं तर आपल्याला चैन पडत नाही. […]
‘पांघरूण’ – बा मांजरेकरा, हे ‘क्षालन’ शब्दातीत झाले आहे रे !
चित्रपट बघितल्या बघितल्या शक्यतो मी त्यांवर लगेच व्यक्त होत नाही, कारण त्याला टिपिकल ” परीक्षणाचा ” वास येतो. मी सावकाश आतमध्ये मुरवत, त्यांवर माझे आकलन/भाष्य व्यक्त करीत असतो. मात्र आज हा अपवाद ! शक्यतो आकलनाचा सूर लावतोय. ” श्वास “, ” दिठी “, ” अस्तु ” यांनी गाठलेली उंची आणि जगभरातील चित्ररसिकांना ज्या मराठीतील चित्रकृतींची नोंद घ्यावीच लागेल या माळेतील “पांघरूण ” हा चित्रपट आहे. […]