नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

निसर्गाचे मानसशास्त्र

निसर्गाचे मानसशास्त्र ही शब्दरचना वाचून गोंधळात पडलात का? पर्यावरण आणि मानसशास्त्र यांच्यात काय नातं असं क्षणभर वाटलं ना? पण असं वाटणारे तुम्ही एकमेव नाही आहात. थोडा नवा प्रकार आहे हा पण भविष्यकाळात मानवजातीवर याचा विशेष प्रभाव पडलेला असेल. मानवाचे भवितव्य ठरविणारा हा उद्याचा एक घटक असणार आहे. […]

‘जागल्यांचे’ हाकारे !

” कोटा फॅक्टरी ” ने अभियांत्रिकी शिक्षण /प्रवेश परीक्षा आणि तरुणांचे कोमेजणे दोन सेशन्स मधून प्रभावीपणे मांडले. आता बघितली – “द व्हिसल ब्लोअर ! ” […]

लताचे पराभव !

७०हून अधिक वर्षे सुरांचे आभाळ समर्थपणे पेलणारी लता ! अनेक सहगायकांबरोबर ती गायली आहे. तिची उंची आता सर्वमान्य झालीय. संगीत क्षेत्राचे वादातीत नेतृत्व तिच्याकडे आहे. अशी गायिका पुन्हा होणे नाही. खुद्द भालजी पेंढारकरांनी तिचे वर्णन ” कृष्णाची हरवलेली बासरी ” असे केले आहे. आनंदघन या टोपणनावानें तिने काही चित्रपटांना दिलेलं संगीत अनुभूतीपलीकडचे आहे. तरीही मी वरील शीर्षक वापरतोय. […]

हरवलेल्या पत्त्यांचा बंगला

हे एक “झोपमोड ” करणारे नाटक आहे (संदर्भ -लोकसत्ता परीक्षणातील शब्दप्रयोग ) म्हणून २६ जानेवारीचा दुपारचा प्रयोग झोपमोड करून आम्ही बालगंधर्वला पाहिला. अल्पावधीतला रौप्यमहोत्सवी प्रयोग त्यामुळे सनई -चौघडे , उत्सवी धावपळ , चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक), मोहन आगाशे वगैरे दिसले. आमच्या यादीत हे नाटक होतेच , पण अचानक २५ ता. ला रात्री ” गुलजार -बात पश्मीनेकी ” हा कार्यक्रम रांग मोडून दांडगाईने पुढे घुसला. […]

ज्ञानेश्वरीतील संगीत शास्त्र -एक चिकित्सक अभ्यास

“ज्ञानेश्वरीतील संगीत शास्त्र -एक चिकित्सक अभ्यास ” या अबोली अमोल सुलाखेंच्या PhD परीक्षेला विद्यापीठातील संगीत -नाटय विभागात उपस्थित राहण्याचा दुर्मिळ योग अमोल सुलाखे नामक “धबधबा ” मित्राने अलवार घडवून आणला. हे सादरीकरण वेगळेच होते. नेहेमीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नव्हते. निवेदनाला साथ होती -पार्श्वभूमीच्या पूर्व -ध्वनीमुद्रित तानपुऱ्याची ! साहित्य आणि संगीत क्षेत्रातील निवडक दिग्गज उपस्थित होते. […]

अनिल काळेले सर !

(माजी) प्राचार्य, (माजी) प्राध्यापक, आजीव प्रशिक्षक आणि त्याहीपेक्षा आजीव शिक्षक असे अनिल काळेले सर रायपूरच्या वास्तव्यात मला भेटणे हे आम्हां उभयतांचे भागधेय ! मराठी माणूस अमराठी मुलुखात भेटणे या अपूर्वाईपेक्षा दोन गोष्टींमुळे आम्ही अधिक जवळ आलो – शिकवणे आणि रंगभूमी ! […]

रूहमें फासले नहीं होते !

आपल्या पाडसांपासून तात्पुरते/कायमचे दुरावलेले नव्याने जुनंच जगायला लागतात- रुहमें फासले नहीं होते ! “क्लब ६०” हा असा दुर्लक्षित शिक्षक ! वयाच्या उताराला लागल्यावर त्या टप्प्याचे शिक्षण देणारा !! […]

ज़िन्दगी, ज़िन्दगी मेरे घर आना I

केव्हा तरी सकाळ होऊन जीवनाला हाकारता यावे – ” ज़िन्दगी, ज़िन्दगी मेरे घर आना !” उगाच रुसून गेलेल्या, आपली चूक नसताही दुरावलेल्या जीवनाला नव्याने आवतण द्यायला हवे- बघ सगळं सहन करूनही,झालेल्या मोडतोडीने खोलवर दुखावून, व्रण मिरवत आम्हीं डगमगत्या पावलांवर उभे आहोत. […]

बिदागी

लहानपणी हा पडदा जे जे दाखवायचा ते ते सारं खरं वाटायचं. अजूनही भावनाप्रधान पाणी येतच टचकन डोळ्यात कधीतरी खूप तीव्र, आतवर भिडणारं बघितलं की, पण त्यावर आता वाढत्या वयाचं लेबल अलगद लावायला शिकलोय मी! चित्रपटगृहाच्या अंधारात याच्याच आश्वासनावर कित्येक तास विनातक्रार घालविले आणि कळालेही नाही, कधी समृद्ध झालो तो! किती शिकवले या पडद्याने- अजूनही त्याची शाळा सुरूच आहे आणि माझ्या हातातील पाटी-पेन्सिलही. […]

शारू रांगणेकर !

खऱ्या अर्थाने ” मॅनॅजमेन्ट गुरु ” म्हणता येईल अशा चार व्यक्ती व्यवस्थापन क्षेत्रात मला भेटल्या ज्या पूर्णतया उर्जावान, ज्ञानी, तपस्वी अशा आहेत- सर्वप्रथम भेटले शारू रांगणेकर, त्यानंतर शेजवलकर, नंतर व्ही. व्ही. देशपांडे आणि सर्वात शेवटी जी. नारायणा उर्फ गुरुजी ! पहिली तीन नांवे आता काळाच्या पडद्याआड गेलीत. […]

1 17 18 19 20 21 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..