चिरायू लोकशाही – सौजन्य प्रजासत्ताक दिन !
वारंवार ११००० फुटांवरील उणे पस्तीस तापमानात झेंडावंदन करणारे आमचे शूरवीर दाखविले जाताहेत आणि आपल्या श्वानालाही उबदार कपडे घालून सकाळच्या फेरीला निघालेली ललना मला “सुप्रभात ” म्हणतेय. […]
वारंवार ११००० फुटांवरील उणे पस्तीस तापमानात झेंडावंदन करणारे आमचे शूरवीर दाखविले जाताहेत आणि आपल्या श्वानालाही उबदार कपडे घालून सकाळच्या फेरीला निघालेली ललना मला “सुप्रभात ” म्हणतेय. […]
११ जानेवारीला अल्वार हून पंतनगर च्या वाटेवर असताना, मित्राने व्हाट्सअपवर कळविले – ” लता मंगेशकर आय सी यू त -कोरोनाची बाधा !” व्हाट्सअप विद्यापीठावर मी शक्यतो विश्वास ठेवत नाही म्हणून घरी पत्नीला तातडीने फोनलो – ” टीव्ही वर काही वृत्त आहे का बघ आणि कळव. ” […]
ग्रेस यांच्या कवितावाचनाची एक CD मी काही वर्षांपूर्वी विकत आणली आणि हे व्यक्तिमत्व माझ्यावर प्रभाव टाकून गेले. सो कॉल्ड “दुर्बोधतेचा “शिक्का त्यांच्यावर मारून मराठीजन मोकळे झाले असले तरी ही व्यक्ती मराठी शब्दांना ज्या अलौकिक उंचीवर नेऊन ठेवते त्याचे विस्मयकारक अनुभव मी अनेकवेळा घेतले. […]
१५ मे १९८३ साली कु. राजलक्ष्मी भगवान नाईक ही सौ. राजलक्ष्मी नितीन देशपांडे बनून माझ्या आयुष्यात आली. म्हणून आम्हां उभयतांसाठी हे संमेलन आणि व्यासपीठ जीवनाचा एक अविभाज्य घटक बनून राहिले आहे. त्यानंतर इस्लामपूरला असताना आम्ही नियमित या संमेलनात जात असू. […]
अशा मालिकेतला २०१९ चा एक चित्रपट अचानक नेटफ्लिक्स वर दिसला- The Sky is pink ! आयेशा चौधरीच्या सत्यकथेवर आधारीत हा चित्रपट आवडून गेला. नांव असं का ठेवलंय, खूप वेळ संदर्भ लागला नाही. मग ट्यूब पेटली- आजकालच्या परिभाषेत प्रसूतिगृहात बाळ जन्माला आले की मुलगा असेल तर ब्लू आणि कन्यारत्न झाले असेल तर पिंक असं म्हणायची पद्धत आहे. […]
या विद्यापीठांचा काही अभ्यासक्रम नसतो , फी नसते , गृहपाठ नसतो ,पदवी नसते , ( तरीही शहाणी माणसे तुम्ही कोणत्या “घराण्याचे ” हे पटकन ओळखू शकतात ) पुस्तके नसतात . सगळी अनुभूतीची पाठशाळा ! AICTE नको ,NBA नको, UGC नको. […]
भुसावळची तापी,सांगलीची कृष्णा, ऋषिकेशची गंगा, नाशिकची गोदावरी अशा नद्यांच्या तीरी उभे राहण्याचे अनेक प्रसंग माझ्यावर आलेत. शेवटी नदीचे ” नदीपण ” तिच्या प्रवाही असण्यात असते. तद्वत ” जयपूर ” असो, वा “किराणा ” किंवा “आग्रा ” घराणे असो , संगीतात प्रवाहीपण आहे का हे माझ्या दृष्टीने महत्वाचे ठरते. […]
शन्ना आणि वपु यांच्या कथांमधील दमदार बीजांना आमच्या चित्रसृष्टीने कधीच न्याय दिला नाही. शन्नांच्या प्रसन्न आणि ताज्या लेखणीने दिलेले दोन चित्रपट मला दिसले- ” आनंदाचं झाड आणि एक उनाड दिवस ! ” ( वपुंचा एकच – ” मुंबईचा जावई “) […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions