” कुसुमाग्रज ” (तात्यासाहेब शिरवाडकर )
माझ्या पत्नीच्या काव्यसंग्रहाला ( ” वाटेवरच्या कविता ” ) शुभाशिर्वाद हवे होते . त्यासाठी तात्यासाहेबांखेरीज वडिलकीचे दुसरे हात कोणते? आम्ही नाशिकला गेलो. […]
माझ्या पत्नीच्या काव्यसंग्रहाला ( ” वाटेवरच्या कविता ” ) शुभाशिर्वाद हवे होते . त्यासाठी तात्यासाहेबांखेरीज वडिलकीचे दुसरे हात कोणते? आम्ही नाशिकला गेलो. […]
“मी अशी सहजासहजी फुकट सही देत नाही.” ते गंभीरपणे म्हणाले. “कोकणात मी माझ्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ एक शाळा बांधतोय. तुम्ही त्या शाळेसाठी काही वर्गणी दिलीत तर मी पावती देईन आणि सहीही !” […]
मराठी वाङ्मयातील एक लोभसवाणे आणि सर्वांचे आवडते नांव म्हणजे -रवींद्र पिंगे ! हात बहुप्रसवा आणि अतिशय प्रासादिक !! सहज सोपे लेखन -पटकन जीवाला भिडणारे . आणखी त्यांचे एक वैशिष्ट्य होते-गुणग्राहकता. […]
मी स्वतः एक सोडून पाच महाविद्यालयांमध्ये नोकरी केली पण तेथेही असले प्रकार नव्हते. अनिवार ओढीने माजी विद्यार्थी यायचे, आम्ही त्यांच्याबरोबर मस्त व्यक्तिगत वेळ घालवायचो आणि “स्नेह “जपायचो- तो आजही टिकून आहे. त्याला असल्या “मेळाव्यांची” गरज नसते. […]
ज्या मित्रांचे/ परिचितांचे जाणे माहित असते अशांना मी आधीच माझ्या मित्रयादीतून वगळतो. पण या “अनोळखी ” दुष्टाव्यांचे काय? एखाद्या मृत व्यक्तीला शुभेच्छा म्हणजे फारच ! […]
स्नेहमेळावा म्हणजे नॉस्टॅल्जिया – गेलेले दिवस/एकत्र घालविलेले क्षण जे कधीच परतून येणार नाहीत, त्यांच्या गल्लीबोळात हिंडून येणे, दैनंदिनीत तेवढाच बदल- टॉनिक सारखा किंवा जीवनसत्वासारखा ! दरवेळच्या “वजाबाकीची ” गुपचूप नोंद घेणे आणि शक्य आहे तोपर्यंत भेटत राहणे – बाकी काही नाही. […]
नंतरचा दीड तास गप्पांची दिलखुलास मैफिल- कित्येक विषयांवर, माझ्या शाळकरी मुलालाही त्यांत अलगद सामावून घेत ! कोठेही बडेजाव नाही, फटकून वागणे नाही, पथ्य /आवडी-निवडीचे अवडंबर नाही. […]
आजवर एकही सामना प्रत्यक्ष पाहिला नसला तरीही “ इन्साईड एज “या वेबसीरीज च्या दोन सीझन्सच्या निमित्ताने घरबसल्या पीपीएल (आय पी एल च्या धर्तीवर) चा दृश्यानुभव घेतला. एकेकाळी “जंटलमेन्स “गेम म्हणून प्रसिद्ध असलेले क्रिकेट दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये “लेट द बेस्ट विन ” या तुरटीच्या खड्याकडे येऊन संपते तेव्हा मनःपूत श्वास सोडावासा वाटला. […]
मल्टिप्लेक्सप्रमाणे किंवा नाट्यगृहांप्रमाणे इथेही भ्रमणध्वनी अधून-मधून तपासणारे श्रोते होते. काहीजण फोटोत छवी टिपण्यात किंवा व्हिडीओ काढण्यात दंग होते. समोरचे “ताजे ” सुरेल क्षण जपण्या ऐवजी त्यांना ते भविष्यासाठी कुपीत ठेवायचे असावेत. याचा काहीसा त्रास जरूर होतो पण सगळेच निमंत्रित ! त्यातल्या त्यात माझ्या शेजारी बसलेल्या रसिक स्त्रीने फक्त ऑडिओ रेकॉर्डिंग केले त्यामुळे कोणाचे लक्ष फारसे विचलित झाले नाही. हाईट म्हणजे एक-दोन श्रोते फारच दाद देत होते माना हलवून ! […]
आमचा हात पुरणार नाही अशा उंचीवर विराजमान झालेला मर्फी रेडिओ हे लहानपणीचे आमचे करमणुकीचे दुसरे साधन. फक्त वडील, क्वचित आई आणि अगदीच क्वचित बिघाड झाल्यावर दुरुस्त करणारे वाणी काका यांनाच रेडिओला स्पर्श करायची परवानगी होती. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions