नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

‘अंगूर’ – स्मितहास्याची प्रसन्न माळ !

विनोदाची खूप रूपे आहेत. मराठीजनांना “पुलंच्या “रूपाने निखळ विनोद काय असतो याचा प्रदीर्घ अनुभव आहे. ऍक्शन विनोद बऱ्याच जणांना आवडतो. द्वयर्थी विनोदानेही एकेकाळी धुमाकूळ घातला होता. प्रत्येक कलावंताची स्वतंत्र शैली असते. विनोदाचा शिडकावा दैनंदिन जीवनात कोणाला नको असतो? पण काहीतरी अंगविक्षेप करून /चाळे करून तात्कालिक हसू फ़ुटेलही पण गुलजारसारखी व्यक्ती तेथेही आपल्या अभिजाततेचा हात सोडत नाही. “अंगूर ” हा परिस्थितीजन्य विनोदाचा एक उत्तम नमुना आहे. […]

आली माझ्या घरी ही “शाळा “!

गेले काही महीने माझ्या घरात माझ्या नातीसाठी सकाळी नऊ ते अकरा चाळीस असा पहिलीचा वर्ग बसतो. चाळीस चिल्लीपिल्ली आपापल्या घरट्यातून स्वतःच्या घरून वर्ग घेणाऱ्या टीचरना हैराण करून सोडतात. नातीबरोबर मी वर्गाला बसतो- वही शोधून दे, पेन्सिलला टोक, पान नंबर हुडकून दे वगैरे मदतनीसाची कामे करत. मस्त मनोरंजन असतं ते आणि माझ्या आज्जी म्हणायच्या तसे “गुरं वळणं ! ” […]

आठवणींचे निर्माल्य !

१९९६ साली माउलींच्या संजीवन समाधीला ७०० वर्षे पूर्ण झाली त्यावेळचे बरेच काही आठवत आहे. बाबा महाराज सातारकर यांचे वेल्हाळ “कैवल्याचा पुतळा ” बघणे/ऐकणे त्यावेळी मस्ट होते. माऊलींची लडिवाळ भाषा बाबा महाराजांनी अलगद टिपली आहे. प्रा. राम शेवाळकर यांच्या ओघवत्या आणि नादमयी भाषेत संत ज्ञानेश्वरांविषयी व्याख्यान ऐकायला मिळाले. येथेही पांडित्य नव्हते पण बरीच अज्ञात दालने खुली झाली. माउलींचा “योगी ” प्रवास दृगोच्चर झाला. […]

पुनर्निर्मिती ( रीक्रीएशन ) !

“सकाळ ” उघडला आणि आनंददायी वृत्त वाचले – ” अमेरिकन कवयित्रीला साहित्याचे नोबेल पारितोषिक ! ” चक्क काव्य या साहित्य प्रकाराला सर्वोच्च सन्मान ! […]

‘नमकीन’- एक हरवलेली अभिजात कविता !

ग्रामीण संस्कृतीवर भाष्य करणारा हा चित्रपट – काहिसा दुर्लक्षित ! यात राजकारण नाही ,अतिरेकी नाहीत फक्त एक छोटासा जीव असलेले कथाबीज आहे. अशा विषयावर इतकी सुंदर चित्रकृती निर्माण करणे फक्त गुलजारसारख्या प्रतिभावंताला जमू शकते. […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ६

घरच्यांना फसवून, क्लास बदलून राहणारे तरुणही कोटा फॅक्टरीत भेटतात. प्रत्येक ” ईशान अवस्थी “ला निकुंभ सर भेटत नाही इथे! दिवसरात्र क्लासमध्ये घालवल्यावरही इथे मुले एज्युकेशनल ऍप वरील लाईव्ह सेशन्स ऐकत असतात. प्रवेश घेतानाच क्लासने टाय-अप केलेल्या महाविद्यालयात अधून-मधून प्रयोग करायला जात असतात. पूर्ण दिवस क्लास केल्यावर महाविद्यालयात जायला वेळ/ऊर्जा कोठे? आणि तसही सगळं क्लासमध्ये कव्हर होतंच. […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ५

उत्खनन करताना काही नाजूक,हळवे आणि कोवळे क्षणही सापडतात “या” कोटा गांवात ! वयच असं असतं या शहरातल्या लोकसंख्येचं की आपोआप तलम नातेबंध तयार व्हायला सुरुवात होते. ती अलगद कलाकुसर बघण्याची चीज आहे. अभ्यास हा जोडणारा स्वाभाविक सेतू असला तरीही स्पर्शाधारित नसलेलं कोवळिकीचं प्रेम येथे भेटतं. मुलींचं हॉस्टेल /पीजी सोय अर्थातच स्वतंत्र असलं तरीही वयापुढे/सहवासापुढे काही चालत नाही. […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ४

वैभव पांडे या प्रातिनिधिक तरुणाच्या प्रश्नांचा प्रवास ” कोटा फॅक्टरी ” मध्ये आढळतो. ” इनसाईड एज ” या मालिकेने जसे क्रिकेटविश्वाच्या पोलादी आणि श्रीमंत विश्वाचे विश्वरूप दर्शन घडविले,तसेच कोटा फॅक्टरी शिक्षण क्षेत्राच्या बाजारीकरणाचे चित्र रंगविते – ते भेदक आहे,त्रासदायक आहे पण आय आय टी च्या ५२६३ जागांसाठी दरवर्षी १० लाखांहून अधिक तरुण (आणि पडद्याआडून त्यांचे पालक) जेव्हा त्यांची स्वप्ने, ऊर्जा, पैसे, वेळ पणाला लावतात तेव्हा प्रश्नही त्याच तोडीचे पडतात. […]

रिसबूड सरांचा तास !

कोण म्हणतं शिक्षक फक्त वर्गात शिकवतात ? या वयातही रिसबूड सरांनी मला परवा तासभर शिकवलं – अभ्यासक्रम वेगळा पण पद्धत तीच ! सांगलीत सरांना फोन करून घरी भेटायला गेलो. त्याच उबदारपणे स्वागत झाले , डोळ्यातला आनंद जुनाच -वय आणि मधला काळ हिरावून नेणारा ! […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ३

पुण्यातील एकेकाळच्या प्रसिद्ध “अमृततुल्य ची जागा जशी ” सायबा,येवले “अशा चेन्सने घेतली तसे आमच्या शिकवणी वर्गांच्या जागी कोचिंग क्लासेस आले. महाराष्ट्रात “चाटे ” निघाले सर्वप्रथम या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पाऊल टाकणारे आणि त्यानंतर आता गल्लीबोळात त्यांच्या आवृत्त्या आहेत. […]

1 22 23 24 25 26 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..