नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

बाप्पा मोरया !

पुढचे दहा दिवस आनंदाचे, चैतन्याचे, मोठमोठ्याने आरती म्हणण्याचे, मोदक आणि खिरापतीवर ताव मारण्याचे ! आज सकाळी झाडावरून ओंजळीत काढलेली फुले घरात नेताना त्यांतील दोन फुले अचानक जमिनीवर सांडली. गेल्या दोन वर्षात अनेक जिवलग त्या फुलांसारखे हातातून निसटले. “उरलेल्या” फुलांनिशी हा सण साजरा करायचा आहे. […]

कार्याचा आनंद

तुम्हाला असं वाटतं का ताण हे आयुष्यातील एक आव्हान आहे, पण प्रत्यक्षात ते हिमनगाचे एक टोक असते. आपल्या हृदयाचे अनुसरण करणे निवडले तर काय होईल हे माहित नसण्याची भीती ही खरी भीती असते. आपल्या कार्याचा आनंद घेणे हेच जीवनप्रवाहाचे रहस्य आहे. […]

नक्षत्रांचे “भोई”

नक्षत्रे आपापल्या स्थानी असतात- त्यांचे चमकणे, उदयास्त सारे ठरलेले असते. एकाचवेळी नभी असंख्य नक्षत्रे झळाळत असतात- थोडी मागेपुढे. त्यांतील काही एकत्र येणे आणि त्यांनी आपल्याला रिझवणे हे आपले गतजन्मीचे सुकृत असते. […]

तुम्ही नसता,तर आम्ही नसतो !!

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा आम्हां भुसावळकरांसाठी क्रेझ असायच्या- पाचवीपासून ते दहावीपर्यंत. (आमच्या काळी ११ वी SSC होती.) त्यामुळे हिंदी/इंग्रजी/गणित/संस्कृत या विषयांच्या परीक्षांसाठी शाळा आणि पालक दोघेही आग्रही असत. आम्हीही ते अतिरिक्त शिकणं आनंदाने स्वीकारत असू. आजही ती सगळी प्रमाणपत्रे मी जपून ठेवली आहेत. […]

५ सप्टेंबर – शिक्षक दिन !!

तरीही “शिक्षक” आणि “गुरू ” मध्ये फरक उरतोच. फ़ार कमी शिक्षक गुरू या पदवीला पात्र ठरतात. गुरू हे मिश्रण काही अलौकिकच ! हाती लागत नाही सहसा ! आता आठवलं की वाटतं आम्हीं नशीबवान ! माझ्या पिढीच्या वाट्याला गुरू जास्त आणि शिक्षक कमी आले. […]

निसर्गभावन “श्रावण ” !

श्रावण म्हणजे माहेर ! घरी जाऊन सण साजरे केल्याशिवाय माहेरवाशीण कधी तृप्त होत नाही. खऱ्याखुऱ्या झाडांना बांधलेल्या झोपाळ्यांवर झुलल्याशिवाय तिच्यासाठी श्रावणाची सांगता होत नाही. त्याकाळी श्रावण हा “इव्हेंट “झाला नव्हता. […]

वाळवण, साठवण – आठवण !

सगळं काही “साथी हाथ बढाना ” टाईप. १०-१२ जणी मिळून तितक्याच घरांसाठी वाळवण आणि साठवण निगुतीने करायच्या. मेहनताना वर लिहिलाय तसा – किंचित चव. तुलना वगैरे नसायची. २-३ महिन्यात वर्षभराची बेगमी ! त्याकाळी हे सगळंच सर्रास दुकानांमध्ये मिळत नसे. त्यामुळे गृहिणी जिंदाबाद ! […]

आठवणींचे वाढदिवस !

लहानपणी शाळेत /गल्लीत कोणाला माझा वाढदिवस माहीत असण्याचे कारण नव्हते.नवीन कपडे वगैरे नसायचे. गोड म्हणून क्वचित शिरा किंवा केळीचे शिकरण ! आई औक्षण करायची. आई- आजींना नमस्कार करायचा. वडील बहुदा परगावी असत. एकुणातच या दिवसाची फार अपूर्वाई नसे आणि आतुरतेने वाट पाहणेही नसे. […]

तेव्हा (१९७२) ते आज (२०२१)

पन्नास वर्षे कालनदीतून वाहून गेली आणि ती सगळी चिमुरडी(?) मुले, आता साठी उलटलेली आजोबा मंडळी झाल्यावर पहिल्यांदाच औपचारिकरीत्या दोन दिवसांसाठी भेटली. […]

जहाँ पे सवेरा हो, बसेरा वहीं हैं !

काहीजणांसाठी “बसेरा ” महत्वाचा असतो. त्यांची पाळेमुळे एकाच मातीत घट्ट रुजलेली असतात. ऊन-वारा-पावसाचा सामना करीत ते जागा सोडत नाही. मग भलेही थोडावेळ सूर्यप्रकाश मिळाला नाही तरी बेहत्तर! ते पर्यायी उजेडाची सोय करतात. याउलट माती-बदलू माणसे गांवोगांवी रोजचा सूर्य धुंडाळत फिरत असतात. […]

1 24 25 26 27 28 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..