नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

क्षण !!

प्रदीर्घ प्रवासानंतर आणि दमवणाऱ्या कष्टांनी थकलेले आपण उभे राहतो खोलीच्या मध्यावर किंवा घर- अर्धा एकर , मैलभर, बेट ,देश तेथे कसे पोहोचलो हे ठाऊक असते तरीही म्हणतो- ” हे माझं आहे ”   हा तोच क्षण- जेव्हा आसपासची झाडे काढून घेतात त्यांच्या दयाळू फांद्या पक्षी माघारी नेतात त्यांचे मधुर गुंजन विदीर्ण सुळके ध्वस्त होतात झुळूक हवेची […]

जगण्याला पार्श्वभूमी बनलेला ‘लताचा’ आवाज !

लता कायम या वेदनांचा आवाज बनते. फक्त स्त्रियांच्याच नव्हे तर जगातल्या सगळ्याच वेदनांना बोलता येत असतं /व्यक्त होता येत असतं तर त्या सगळ्यांनी एकमुखाने (!) तिचाच आवाज निवडला असता, इतका तो “संपूर्ण ” आणि “अमर्त्य ” आहे. […]

‘हाथ छूटे भी तो’ – सांत्वनांचे टाहो !

काल राहुल देशपांडेंचे तू-नळीवरील ताजे ताजे ” माई री, मैं कासे ” ऐकत होतो आणि अचानक “पिंजर ” मधील या गाण्याची आठवण चमकून गेली. गुलज़ार / उत्तम सिंह आणि जगजीत यांचे ” हाथ छूटे भी तो ” माझ्याकडील “मरासिम ” च्या कॅसेट मध्ये होतं. तलम रेशमी, जीवन पचविलेल्या आवाजात जगजीतने ते गायले आहे. […]

दिवाळी अंक – सांस्कृतिक संचित !

दिवाळी अंकांची दुनिया आणि व्यथा अधिकच वेगळी- उणेपुरे तीन चार महिन्यांचे आयुष्य, किमती शेकड्यात म्हणून ही इंडस्ट्री कायम ग्रंथालयांच्या आणि जाहिरातींच्या जीवावर चालली आहे. मग ७५ वर्षांचे आश्चर्य अधिक वाटते. नेटाने वल्ही मारणारे संपादक येथवर नाव आणून सोडतात तेव्हा आपण त्यांच्याबद्दल किमान कृतज्ञ तरी राहायला हवे. […]

वपु !

परवाच्या धांडोळ्यात हे पत्र सापडलं. त्याकाळी जनरली मोठे साहित्यिक अनोळखी पत्रांनाही त्वरीत उत्तर देत. झाले असे की, तो काळ (इतरांप्रमाणे) मीही वपुंचा प्रचंड फॅन असण्याचा होता. त्यांची पुस्तके वाचून (विशेषतः “पार्टनर “) मी एका उर्मीत त्यांना एक पत्र लिहिले होते. त्यांत विचारलं होतं – […]

भावगंधर्व

“भावगंधर्वांच्या” वरील पत्राला कारण म्हणजे एकदा आम्हीं माझ्या पत्नीच्या काही कविता त्यांच्या अवलोकनार्थ पाठविल्या होत्या. त्यांना हृदयनाथांनी चाली लावाव्यात आणि ध्वनिमुद्रण करून ती गीते रसिकांना उपलब्ध करून द्यावीत अशी संकल्पना होती. […]

‘वो शाम कुछ… ‘

हळवेपण ही भावना साधारण स्त्रियांशी संलग्न असते. पण ठरविले तर एखादा पुरुष उत्कट हळवा होऊ शकतो याचा थरार आणणारा अनुभव किशोर देतो ” वो शाम कुछ अजीब थी ” या ओळींना जिवंत करून ! […]

‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा !

निवृत्त न्यायाधीश मा. प्रदीप जोशी यांनी भारतातील या असंभव, अशक्यप्राय संकल्पनेवर लिहिलेलं,  भारतीय विचार साधनेतर्फे ३० जून २०२१ ला प्रकाशित झालेलं हे पुस्तक काल श्री किशोर शशीतल आणि डॉ मुकेश कसबेकर यांनी माझ्या हाती ठेवले. […]

एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी !

डॉ आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुळकर्णी, उत्तरा बावकर, अमृता सुभाष सारेजण माउलींच्या बोटाला धरून “दिठी ” दाखवितात. राहता राहिला “किशोर कदम ” ( सौमित्र). त्यालाही “अनुभवावे.” इतका उच्च कोटीचा अभिनय अभावानेच पाहायला मिळतो. तो रामजीमय झालाय. उण्यापुऱ्या एक तास सत्तावीस मिनिटांनी आपण आधीचे राहिलेलो नसतो. […]

सागर आणि नदी

सागराला गळामिठी मारताना नदीचा पाय क्षणभर मागे सरतो I पर्वतशिखरापासून सुरु झालेला, वाटेतल्या जंगलांना, खेड्यांना वेढे घालत इथवर झालेला प्रवास ती वळून बघते म्हणे – आणि समोर दिसत असतो अथांग रत्नाकर, त्यांत सामावणे म्हणजे स्वतःचे वेगळे अस्तित्व संपणे I पण परतीचा मार्ग खुंटलेला कोणीच परतू शकत नाही I परतणे म्हणजे एकप्रकारे केलेला प्रवास नाकारणे I सागरात […]

1 25 26 27 28 29 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..