माझी “थकत” चाललेली माणुसकी !
आयुष्यात इतकी प्रदीर्घ चाललेली, आऊट ऑफ सिलॅबस असलेली ही प्रश्नपत्रिका पहिल्यांदाच वाट्याला आलीय. वाढत्या वयाबरोबर माझी माणुसकीही थकत चालली आहे बहुधा ! […]
आयुष्यात इतकी प्रदीर्घ चाललेली, आऊट ऑफ सिलॅबस असलेली ही प्रश्नपत्रिका पहिल्यांदाच वाट्याला आलीय. वाढत्या वयाबरोबर माझी माणुसकीही थकत चालली आहे बहुधा ! […]
कितीतरी पारितोषिके मिळालेली स्मिता मला भावून गेली. अतिशय बोलक्या डोळ्याची, मनस्वी कलावंत ! ” उंबरठा ” हा सर्वार्थाने तिचा चित्रपट होता. आणि हे गाणेही केवळ तिचेच होते. जब्बारला तिच्यापेक्षा समर्थ पर्याय त्यावेळी तरी मिळाला नसता. […]
मिरजेला रोटरॅक्ट क्लबने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी आणि सुधीर नेरुरकर वालचंद तर्फे तर तो आणि अविनाश भोंडवे बी. जे. मेडिकल तर्फे प्रतिस्पर्धी होतो. दोन दिवस स्पर्धा चालली. (होय त्याकाळी वक्तृत्व आणि वाद-विवाद स्पर्धा खरंच दोन दिवस चालत. ५० च्या वर स्पर्धक हिरीरीने आणि चुरशीने भाग घेत असत.) ती आमची पहिली भेट आणि मैत्रीची सुरुवात ! साल होतं -१९८०. […]
भुसावळला वसंत टॉकीज च्या वरती “राजश्री ” चे ऑफिस होते. गल्लीमित्र कमलाकर भोळे याचे वडील तेथे नोकरीला होते. बरेचदा सायकलवर मोठ्या लोखंडी पेट्या किंवा रिळांच्या बॉक्सेसची ते ने-आण करीत. त्यांनी आम्हाला एकदा टीप दिली होती- “कोणताही सिनेमा पाहायचा असेल तर तो फर्स्ट डे फर्स्ट शो बघावा किंवा लास्ट डे लास्ट शो !”
कारण गावात रिळं आलीत की टॉकीज मधील पहिल्या शोला कापाकापी नसते. […]
विचार आणि वर्तनाचे (त्यातून कृतीचे) मेंदू हे उगमस्थान असते. त्यावर आपले “होणे” अवलंबून असते. गैरवापर केला तर आपण वेगळे होतो आणि सदुपयोग केला तर वेगळे असतो. आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मेंदूच्या सूचनेबरहुकूम होत असतात. याहीपलीकडे एक कार्य असते- प्रतिक्षिप्त क्रियेचे! […]
मागील आठवड्यात गाजावाजा झालेला लिटील चॅम्प्स बघितला. पंचरत्न म्हणून पुढे महाराष्ट्रात नावाजली गेलेली मुग्धा, कार्तिकी, आर्या, रोहीत आणि प्रथमेश आता वेगळ्या भूमिकेत दिसली. आणि त्यांना ते काम अजिबात जमत नव्हतं. एकतर त्यांची गायक म्हणूनच अद्याप कारकीर्द मोठी नाही, रियाझ /साधना पूर्ण झालेली नाही आणि लगेच त्यांना इतरांचे मूल्यांकन करायला सांगणे? […]
मानव संसाधन विकासात मानव या शब्दाची व्याख्याच मुळी “क्षमतांचे गाठोडे” अशी केली आहे. काही क्षमता आपल्यात जन्मजात असतात – वंशपरंपरेने आलेल्या! काही आपण विकसित करीत असतो. पण प्रश्न असा आहे की, स्वतःच्या क्षमता आपणांस माहित असतात का? बऱ्याच जणांना माहित नसतात हे या प्रश्नाचे खरे आणि म्हणूनच कदाचित न आवडणारे उत्तर आहे. […]
थोड्या वेळापूर्वी ” आंटीने वाजविली घंटी ” हा चित्रपट टीव्ही वर लागला होता. १९८८-८९ ला आम्ही इस्लामपूरला असताना एक स्थानिक दिग्दर्शक श्री दिनेश साखरे (ते एका शाळेत शिक्षकही होते) यांनी हा चित्रपट काढला. निळूभाऊ, अलका कुबल, लक्ष्मीकांत बेर्डे , आशा पाटील अशी तगडी स्टारकास्ट. त्याच्या तीन आठवणी – […]
मानवी मेंदूसारख्या गुंतागुंतीच्या किचकट अवयवाबद्दल आपणास खरंच कितपत माहिती आहे? उत्तर असं आहे – फारशी नाही. मेंदू या अवयवावर आजतागायत सर्वाधिक संशोधन झालेलं आहे आणि अजूनही सुरु आहे. मात्र हातात काही भरीव लागत नाही. शरीराचे अनभिषिक्त सत्ताकेंद्र मेंदू आहे. प्रसंग, परिस्थिती, घटना यांच्याबाबत अहोरात्र माहिती घेऊन त्यांवर तातडीने निर्णय घेणे हे मेंदूचे प्राथमिक कार्य असते. सर्व अवयवांमध्ये सुसूत्रता राखणे आणि शरीराचे कामकाज सुरळीत सुरु ठेवणे यामध्ये मेंदू गुंतलेला असतो. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions