नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

शाश्वताच्या दालनात पाऊल !

मी या जगातून एक दिवस ठरवून लुप्त होईन जंगलात एकाकी भटकण्यासाठी तुझे जीवनगाणे गाण्यासाठी त्या गाण्यात माझे तुझ्यावरचे छुपे प्रेम असेल, त्यातील माझे मधुर शब्द सतत प्रवास करतील तुझ्या दिशेने मध्यरात्री तेजस्वी पूर्ण चंद्र त्याचे सौंदर्य उधळीत असेल तेव्हा मूक विस्मय नक्कीच उमटेल तुझ्या चेहेऱ्यावर मग गुरुदेवा तुझ्या उपस्थितीत, माझी कृतज्ञता हळू हळू प्रकट होवो . […]

प्रार्थनांचे सहस्वर !

शालेय कालखंडानंतर प्रार्थना आपल्या आयुष्यातून हद्दपार होते. क्वचित घरात संध्याकाळी ” शुभं करोति ” असे बोबडे बोल उमटतात, एखाद्या धार्मिक कार्यक्रमात आपण प्रार्थना करतो, अध्यात्मिक सत्संगात प्रार्थना भैरवीसारखी असते- ” लोकः समस्ता सुखिनो भवन्तु ” वगैरे! कार्यक्रम संपल्याची ती नांदी असते, पटकन डोळे उघडून दैनंदिनीत शिरायला मोकळे! […]

मेल – फिमेल व्हर्जन्स !

बासुदांच्या निधनानंतर श्रद्धांजलीच्या पोस्ट्समध्ये लताच्या आवाजातील “रिमझिम गिरे सावन ” नव्याने ऐकलं. मी पाहिलेल्या “मंझिल ” च्या प्रतीत ते समाविष्ट नव्हतं, पण बहुधा या खूप वर्ष रखडलेल्या चित्रपटातील एडिटिंग मध्ये ते उडवलं असण्याची शक्यता आहे. […]

स्वतःला घडविताना !

प्रत्येकाला स्वतःमधील कोणीतरी असा “स्वतः “घडविता आला पाहिजे, ज्याचा इतरांना अभिमान वाटेल, स्वतःची मान गर्वाने उन्नत करता येईल आणि जे डोळ्यापुढे असेल, ते हाताच्या आवाक्यात आणता येईल. त्या वाटेवरील काही पायऱ्या…. […]

जाहल्या काही चुका…..

एक अत्यंत नितांत सुंदर भावना शब्दबद्ध करणं हे खूपच अवघड काम पण पाडगावकरांनी ते लीलया पार पाडले. खळेंसारख्या श्रेष्ठ संगीतकाराने आपल्या चालीने आणि संगीताने त्यात आणखी गहिरे रंग भरले. आणि लताने ती आर्तता, लीनता, अत्यंत संयमित, संतुलित आणि शांत स्निग्ध स्वरात परीपक्वपणे मांडली. या गाण्यातील शब्दाशब्दांचे विवेचन आमच्या मैत्रिणीने तितक्याच तोलामोलाने सिद्ध केले -अभिनिवेश न आणता ! […]

ताण – तणावांचे विषाणू

ताण -तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण -तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण -तणावांना काही देणे -घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे. […]

सवयींचे व्याकरण !

स्वभावातून सवयीचा उगम पावतो. लहानपणापासून सगळ्यांनाच बऱ्या-वाईट सवयी लागतात. अगदी बालसुलभ म्हणजे अंगठा चोखणे, नखे कुरतडणे, दिसेल ते तोंडात घालण्याची प्रवृत्ती असणे. ! त्यानंतर खोटे बोलणे, भरभर (अथवा हळूहळू) जेवणे, कोठेही (दिलेल्या) वेळेवर पोहोचणे, गोष्टी/ कामे पुढे ढकलणे, सकाळी उशिरा उठणे आणि ही यादी संपता संपणार नाही. […]

‘हम’ कितने (?) ‘एकाकी’

साहाजिकच जगभर एकाकी अवस्था आणि त्याचे स्वास्थ्यावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम यांवर संशोधन सुरु झाले आहे. जास्त कालावधीसाठी एकाकी असलेल्या व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर जास्त परिणाम झालेले आढळतात, अगदी सिगारेटच्या व्यसनाइतके अथवा लठ्ठपणाच्या दुष्परिणामां इतके ! […]

भावनिक आरोग्य

संगणक दोन भागांपासून बनविलेला असतो- हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ! मानवी शरीरातील बाहेरची कातडी, हाडे,स्नायू हे दृश्य भाग म्हणजे हार्डवेअर ! आणि मन, भावना, आत्मा हे अदृश्य भाग म्हणजे सॉफ्टवेअर ! मात्र हे दोन्ही घटक आतून एकच असतात. तसेच बाह्य विश्व आणि शरीरातील अदृश्य शक्ती एकमेकांना जोडलेले असतात. भावनिक आरोग्य सॉफ्टवेअरशी संबंधित आहे. आपल्या प्रत्येक कृतीमागे ते असते. […]

‘लघु’ जीवन !

बघता बघता आपले करमणुकीचे जग आक्रसत गेले. चित्रपटाची लांबी खुपायला लागली. दोन तासांपेक्षा जास्त वेळ चित्रपटगृहात बसणे म्हणजे वेस्ट ऑफ टाइम वाटू लागले. नाटके कापून “दोन अंकी” फ्लेवर मध्ये सर्व्ह व्हायला लागली. पुढे जाऊन दीर्घांक ( मध्यंतर विरहित सलग नाट्यानुभव देणारे) सादर व्हायला लागले. टीव्हीवरील मालिका २० मिनिटांमध्ये करमणुकीचा समर्थ डोस देऊ लागल्या. कादंबरीची कथा आणि नंतर “अलक ” ( अति लघु कथा ) झाली. महाकाव्यांच्या “चारोळ्या ” झाल्या. […]

1 27 28 29 30 31 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..