स्वतःशी नाते
स्वतःला अलीकडच्या काळात निवांत कधी भेटला आहात ? आणि स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं इतक्यात कधी निरखून पाहिलंय? जन्मल्यापासून आपण फक्त आणि सदैव स्वतःच्याच सान्निध्यात असतो. स्वतःला इतर कोणाहीपेक्षा आपणच अधिक ओळखत असतो. पण हे “ओळखपत्र ” बाह्य असतं की अंतर्गत? वपु म्हणतात- ” ओळखपत्रासारखं विनोदी दुसरं काही नाही. आपण कसे आहोत हे दाखविण्यापेक्षा आपण कसे दिसतो हे ओळखपत्र दाखवतं.” असं तर आपल्याबाबतीत घडत नाही नं, हा प्रश्न एकदातरी स्वतःला विचारायलाच हवा. […]