माझ्या मातीचे गायन !
१९९६ साली माझ्या पत्नीचा दुसरा काव्यसंग्रह ” वाटेवरच्या कविता ” प्रकाशित करण्याचा विचार पुण्यातील नीहारा प्रकाशनाच्या सौ. स्नेहसुधा कुळकर्णी यांनी बोलून दाखविला. मुखपृष्ठाची संकल्पना आमच्या गणपतीपुळे ट्रीपच्या बागेतील एका छायाचित्रावरून सुचली. प्रस्तावनेसाठी सुधीर मोघेंशी संपर्क साधला आणि काहीशा झटापटीनंतर ती मिळाली. (वो कहानी फिर कभी !) प्रश्न उरला – आशीर्वादाचा! यासाठी साहित्य सृष्टीतील आजोबा ” कुसुमाग्रज ” यांच्यापेक्षा अधिक समर्थ व्यक्ती कोण असू शकेल? […]