भुसावळची दिवाळी !
दिवाळीची चाहूल भुसावळला लागायची पाच पावलांनी ! शाळेची सुट्टी, सुट्टीतील लायब्ररी, थंडी, फटाके चिंतन, व आकाशकंदील ! नवे कपडे बहुदा दसऱ्यालाच घेतले असल्याने दिवाळीत त्यावर फुली असे. तसे अप्रूपही नसायचे. घरातील वडीलधाऱ्यांच्या अंगी सणासुदीलाही क्वचितच नवे वस्त्र दिसे. हट्ट फक्त लायब्ररीची वर्गणी आणि फटाक्यांसाठी असायचा आणि तो पूर्ण व्हायचा. […]