नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

स्वरराज मदन मोहन

हा गायक -संगीतकार ओरिजिनल होता, जी एक विलक्षण आणि अविश्वसनीय बाब आहे या चित्रसृष्टीत ! भलेही इतरांनी त्याचे अनुकरण केले असो. पण हा मात्र एकांडा शिलेदार ! त्याची काही वैशिष्ट्ये ! […]

बाबू मोशाय – वो आज भी ‘करीब’ हैं !

शरीरयष्टी (सिक्स पॅक) वगैरे विना अभिनय करता येतो किंबहुना अभिनेत्याला सगळं चेहेऱ्यावरून आणि देहबोलीतून व्यक्त करायचं असतं, त्यासाठी पहिलवान असण्याची गरज नसते अशा काळातला राजेश खन्ना ! दिसायला सर्वसामान्य असणं हे त्याच्या भात्यातील प्रभावी अस्त्र होतं. अतिशय हळुवार ,नाजूक ,कोवळ्या अलवार भावना त्याच्या आवाजातून आणि चेहेऱ्यावरून व्यक्त व्हायच्या. […]

‘चकीत’ करणारी नाती !

“रामप्रसाद की तेरहवीं” पाहिला. काही दिवस आधी अशा कथेवर आलेला समांतर ” पग्लाईट (PAGGLAIT) पाहिला होता. एक मृत्यू आणि त्याभोवती तेरा दिवस मनाविरुद्ध फिरणारे कुटुंबीय, नातेवाईक ! त्यांच्यातील दऱ्या, वरवरची मलमपट्टी, अंतर्गत धुसफूस आणि अशा कर्मकांडात रस नसलेली (पण जबरदस्तीने ओढून आणलेली) नवी पिढी. मग ते तेरा दिवस जुनेपुराणे हिशेब चुकते करण्याकडे कल. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला “तेच तेच ” सांगणे, तोंडाला पदर धरून. […]

हमने तुमको देखा !

मित्र झळकीकरच्या बरोबर कॉलेजच्या पायवाटेवर ऋषीचा पाहिलेला पहिला पिक्चर ! (अंहं – बॉबी खूप नंतर पाहिला आणि जोकरही) तेव्हापासून याला आम्ही पाहिलं अगदी शेवटच्या “मुल्क ” पर्यंत ! सुमारे ४०-५० चित्रपट या कलावंताचे मी आजवर पाहीले असतील आणि एकच केलं – आमच्या देव्हाऱ्यात दाटिवाटीत त्याला बसविले , शेजारच्या अमिताभ नामक कुलदैवताला धक्का न पोहोचविता ! […]

अलविदा नसलेली एग्झिट !

इथे दंतकथांच्या वदंता होतात. हे पुढच्या पिढ्यांना सप्रमाण सांगायची जबाबदारी आता आपली ! “इरफान ” नांवाची दंतकथा प्रत्यक्ष पाहिली याबद्दल स्वतःची पाठ थोपटून मी आता त्याचे न बघितलेले चित्रपट पाहणार आहे – तेवढंच माझ्या हाती आहे. […]

तुम अपना रंज ओ गम अपनी परेशानी मुझे दे दो !

१९६४ च्या “शगुन ” मधील खय्याम ने संगीतबद्ध केलेलं हे गीत त्याच्या पत्नीने (जगजीत कौर ने) गायलेलं ! गीतकार- हिंदीतला आजवरचा ऑल टाइम ग्रेट – साहीर ! (त्याच्या नंतर गुलज़ार , मग जावेद , मग निदा फाजलीं – ही माझी यादी ) […]

चित्रपटांमधील “अढळ” स्मृतिचिन्हे !

चित्रपटातील कथानकाला ,संवादांना स्वतःचे असे स्थान असते. पण काही परिणामकारक प्रसंग त्या चित्रपटाचा पोत ३६० अंशातून बदलतात आणि कायमचे लक्षात राहतात. कथा पुढे तर नेतातच पण अभिनयाने जो अभिप्रेत असलेला संदेश देतात तो बराच काळ टिकतो. हिंदी चित्रपटांमधील मला आवडलेले चार प्रसंग- […]

तो….

जातो छापील अभ्यासक्रमाच्या बाहेर काळजी घेतो ” मानसिक ” आरोग्याची हळुवार शब्दांनी फुलवतो मने विकासाच्या फुलांना गंध देतो त्याला आयुधं लागत नाही – वन्ही पेटवायला ! तो अनादी आहे- अनंत आहे त्याच्यावाचून जग शक्य नाही तो कधी सांदीपनी होतो , कधी चाणक्य तर कधी अब्दुल कलाम आई तर तो कायम असतोच पण वडिलपणही अबोलपणे निभावतो ” […]

तेरे मेरे बीचमे कैसा हैं ये बंधन !

” एक दूजें के लिये ” ने १९८१ साली धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या प्रत्येक आघाडीवर ( अभिनय, गीत, संगीत, पार्श्वगायन, गोव्याची नयनरम्य पार्श्वभूमी ) हा चित्रपट देखणेबल होता. “बॉबी” नंतर ची ही तुफान गाजलेली प्रेमकथा (शेवट सुखांत नसला तरीही). कमल आणि रती ही नवोदित फ्रेश जोडी देणारा हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी मन तृप्त होत नाही. […]

लिंबलोण उतरू कशी ?

“एकटी ” मधल्या सुलोचना दीदी कायम “आई “दिसल्या – मुलामध्ये आणि संकटांमध्ये ठाम उभ्या असलेल्या आईसारख्या ! गीतातील भाव चेहेऱ्यावर साकार करणाऱ्या ! सकाळी सकाळी सुमन कल्याणपुरांच्या साय भरल्या आवाजात हे गाणं ऐकलं. […]

1 31 32 33 34 35 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..