नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

सुनीताबाई – सौदामिनी !

सुनीता बाईंशी मी दोनदाच फोनवर बोललो आहे- वालचंद ला असताना आम्ही ” तुझे आहे — ” बसविले होते. मी त्यांत “आचार्य ” ची भूमिका केली होती. मनाच्या एका तारेत पुलंना पत्र लिहिलं – ” तुमच्या या मानसपुत्राला आशीर्वाद द्या.” उत्तर आलं नाही. फोन लावला, पलीकडून सुनीताबाईंचा आवाज – ठाम नकार आणि फोन कट ! […]

पिंजरा – प्रवाहपतितांचा प्रवाह !

डॉ. लागूंसारखा बलदंड अभिनेता या चित्रपटाने दिला. त्यांनी पूर्ण ताकदीनिशी आपले पात्र रंगविले. संध्याचे करियर उताराला लागले होते, ते पुन्हा या चित्रपटामुळे थोडेसे गतिमान झाले. […]

‘अस्तु’ – उत्तरायणाचे लामणदिवे !

काही चित्रपट बघितल्याशिवाय मरायचं नसतं म्हणे ! “अस्तु ” त्यातील एक आहे. एकदा बघितला की संवेदनांची समृद्धी वाढते. वारंवार बघितला की जगण्याचे पापुद्रे अलगद सुटत जातात आणि मोकळं व्हायला होतं. […]

सनी देओलचा ‘मोहल्ला अस्सी’

कल्याणी ताई आमच्या एका व्याख्यानात म्हणाल्या होत्या- ” देव आपली परीक्षा पाहात असतो. ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत तो मदतीला येत नाही, पण (भक्तांचे) १२ ही वाजू देत नाही.” अस्सी घाटावर शांतपणे दिवे सोडणाऱ्या सनी – साक्षी बरोबर आम्हां पती-पत्नीलाही त्यावेळी कल्याणी ताईंच्या वाक्यामागे साक्षात काशी विश्वेश्वर उभा असलेला जाणवला. […]

परतणारे जत्थे !

ज्याला मी “निळ्या डोळ्यांचा जादूगार ” म्हणतो त्या राज कपूरला सतत भव्यतेचे उत्कट वेड होते. त्याअर्थाने त्याने ७० एम एम पेक्षाही भव्य दिव्य स्वप्नप्रसंग चित्रित केले. केव्हढा आवाका असलेला हा कलावंत – निर्मितीत कोठेही तडजोड न करणारा. […]

‘दस्तक’ – मोहोल्ल्याच्या कानांवरची !

पण “दस्तक” मधील लता -सुरीली ! आपल्या आवडत्या मदन भैय्या च्या ओंजळीत ती सगळा गोडवा ओतायची, आणि ही गोड तक्रार खय्याम पासून सर्वांची ! लताच्या सर्वाधिक आवडीच्या पहिल्या दहा गाण्यात मदनमोहनची जास्त आहेत. पारितोषिकांनी या चित्रपटाची झोळी भरली. यथावकाश या चित्रपटातील सर्व मंडळी कर्तृत्वाच्या उंचीवर पोहोचली – अपवाद रेहानाचा ! तिची दस्तक कानांवर जास्त काळ रेंगाळली नाही. […]

‘अर्धसत्य’ – व्यवस्थेची वैश्विक थुंकी !

अनंत वेलणकर आणि ज्योत्स्ना गोखले अशी मराठी नावं, तीही एखाद्या हिंदी सिनेमातील हिरो -हिरॉईनची, सोबतीला गुप्ते ,पाटील असे पोलीस अधिकारी (मुंबईतला सिनेमा म्हणून ), माधुरी पुरंदरे आणि सदाशिव अमरापुरकर अशी दिग्गज मंडळी आणि या सर्वांना एकत्र आणणारी मराठमोळ्या विजय तेंडुलकरांची दाहक लेखणी ! आज यातील ओम पुरी, अमरीश पुरी, शफी इनामदार, सदाशिव अमरापूरकर, स्मिता पाटील, दस्तुरखुद्द तेंडुलकर सारे सारे काळाने आपल्या पडद्याआड नेले आहेत पण “अर्धसत्य ” काही विसरता येत नाही. […]

जाते हुए, यह पल छीन – जातानाचे कोडे !

रवींद्र जैन संगीतकार आणि विशेषतः गायक म्हणून मर्यादीत यशस्वी झाला, पण एवढया एका हळव्या, कातर गाण्याने तो मला कायमचा प्रिय झाला. सगळं संपलेले सूर त्याने कमालीच्या ताकतीने सादर केले. या गाण्याव्यतिरिक्त त्याने आणखी काही केले नसते तरी चालले असते ! […]

आकाशगंगांचे निर्माते

…… माझ्या दृष्टीने ही विद्यापीठे आहेत. त्यांच्या शिष्यांनी आपलं आभाळ व्यापलंय, पण आभाळात अशा असंख्य आकाशगंगा असतात. या तीन आकाशगंगांच्या निर्मात्यांबद्दल आज एवढंच ! […]

‘काला पत्थर’ – दुर्लक्षित ज्वालामुखी !

फक्त अमिताभ नावाचा ज्वालामुखी लक्षात राहिला “काला पत्थर ” मध्ये ! गुलछबू शशी, रेकणारा शत्रू , हातीच्या खेळण्यांसारखीच कचकड्याची नीतू आणि देखाव्याचा पीस परवीन ! नाही म्हणायला राखी थोडी टिकली पण तीही वय, आवाज आणि काहीसा सुजलेला लूक यामुळे वयस्कर डॉक्टरीण वाटली फक्त !आख्खा चित्रपट अमिताभ -सेंट्रिक डिझाईन झालेला मग सगळ्यांची स्क्रीन स्पेस आक्रसणारच. […]

1 32 33 34 35 36 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..