माणसांना उभे करणारे शब्द !
दैनंदिन पहाटफेरीनंतर घरी परतत होतो. शेजारून एक वृद्ध गृहस्थ हातातील मोबाईलवर गाणं ऐकत तन्मयतेने जात होते – ” छोड दे सारी दुनिया किसीके लिए I ” माझा मित्र जयंत असनारे याचे हे “जीवनगीत (Life Song) आहे. […]
दैनंदिन पहाटफेरीनंतर घरी परतत होतो. शेजारून एक वृद्ध गृहस्थ हातातील मोबाईलवर गाणं ऐकत तन्मयतेने जात होते – ” छोड दे सारी दुनिया किसीके लिए I ” माझा मित्र जयंत असनारे याचे हे “जीवनगीत (Life Song) आहे. […]
मी शक्यतो राजकारण किंवा राजकारणी व्यक्तीसंदर्भात लिहीत नाही. कोणी मला पाठविले/ टॅग केले तर प्रतिसादही देत नाही. माझी (बरीवाईट) मते माझ्यापाशी. जसे आपण निवडणुकीत ज्याला द्यायचे त्यालाच मत देतो, पण दारी आलेल्या प्रत्येक पक्षाचे/उमेदवाराचे मान डोलावून स्वागत करतो, तसे माझे हे वागणे ! पण गेले काही महीने देश/राज्य पातळीवर जे काही चाललं आहे/ दिसतं आहे, वाचनात येत आहे, ऐकू येत आहे ते अस्वस्थ करणारं आहे. […]
” जंजीर, दिवार, शोले ” च्या ” अँग्री यंग ” प्रतिमेतून हृषीदांना आणि दस्तुरखुद्द अमिताभलाही बाहेर पडावंसं वाटलं असेल , तो क्षण म्हणजे ” आलाप” ! पण दुर्दैवाने हे प्रतिमा -परिवर्तन चाललं नाही. चित्रपटभर त्वेषाने एकही ठोसा न मारणारा, सौम्य गायक अमिताभ चुकीच्या वेळी पडद्यावर आला. तो आणि त्याचे चाहते तोवर प्रगल्भ झाले नव्हते. अशोक सराफवरही पडलेला विनोदी अभिनेत्याचा शिक्का त्याला नीटसा पुसता आला नाही. ” सुशीला ” किंवा अलीकडचा “एक उनाड दिवस ” मध्ये त्याने परीघ ओलांडायचा प्रयत्न जरूर केला पण परत रिंगणात आला. […]
कित्येक कवी,लेखक,साहित्यिक आपले सगळेच लिखाण छापतात/ प्रकाशात आणतातच असे नाही. खूपसे सर्ग अंधारातच राहतात. आपल्या-तुपल्या सारखे रसिक अतृप्त राहतात जीवनभर -आपला काहीच दोष नसतानाही या खजिन्या पासून आपण वंचित राहतो. खूपसे गायक/ अभिनेते त्यांचे सगळे कर्तृत्व पडद्यावर/रंगमंचावर आणतातच असे नाही. […]
साधारण हीच सकाळची वेळ ! ब्रेकफास्ट आटोपून दुसऱ्या चहाची वाट पाहात असताना सहज टीव्ही च्या रिमोटची खुंटी पिरगाळली. स्टार गोल्डवर ” रोड टू संगम ” पाटी दिसली. नांव न ऐकलेले पण ओम पुरी व परेश रावल (सोबतीला काही मराठी नांवे – राजन भिसे, स्वाती चिटणीस वगैरे) ! […]
आजवर चित्रपटगृहातील पांढरा पडदा “दाखवायचा”, काल मी त्याला दोन तास बोलताना पाहिलं. ही किमया साधलीय विधू विनोद चोप्राने ! शरणार्थी (?- हा शब्दच मुळात चुकीचा आहे – कोणाला शरण आलेत ते , जर मुळातून हा देश तुमच्या माझ्या इतकाच त्यांचा आहे.) काश्मिरींनी मूकपणे १९९० पासून जे सोसलंय, जे फारसं कालपर्यंत मलाच माहीत नव्हतं, त्या साऱ्यांच्या वतीने काल त्या पांढऱ्या पडद्याला बोलताना मी पाहिलं. कमल हसन च्या “पुष्पक ” प्रमाणे हा चित्रपट शब्दहीन असता तरी चाललं असतं. […]
हा मनुष्य कायम हातातून निसटतो. त्याचा स्पर्श जाणवतो, त्याचे शब्द भिडतात, त्याचे संवाद तीक्ष्णपणे काळजात घुसतात. त्याच्या धवल वस्त्रांवरचे फाळणीचे डाग पुसट होता होत नाही. त्याचे चित्रपट म्हणजे त्याच्या कविता ! भाषाप्रभुत्व शब्दातीत, आपल्याला जे बोलायचे असते, नेमकं तेच त्याच्या लेखणीतून / संवादातून / कथांमधून उमटतं. व्यक्तिगत सुखदुःखांवर तो वेगवेगळ्या माध्यमातून भाष्य करतो पण त्यातही हाती […]
सांगलीत वालचंदला असताना आम्ही “चम्बल की कसम ” नामक एक पडेल चित्रपट पाहिला तो खय्याम आणि साहिर या जोडगोळीच्या एका हळुवार प्रेमगीतासाठी ! अन्यथा राजकुमार, त्याला प्रतिकूल मौशुमी आणि होडीवाला ठोकळा शत्रुघ्न असलं कॉम्बिनेशन बघणं नजरेला फारसं आल्हाददायक नव्हतं. […]
१९७६ ला मुकेशचे पार दूर देशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि इकडे सोलापूरच्या दयानंदमधील आमच्या गॅदरिंग प्रॅक्टिसला मित्र अनिलला हुंदका आवरेना. तो आरके च्या ताज्या गाण्याची “इक दिन बिक जाएगा, माटी के मोल ” ( धरम -करम ) रिहर्सल करीत होता. त्यादिवशी एकट्या राज कपूरचा “आवाज ” गेला नाही. आम्ही आपोआप श्रद्धांजली मोडवर गेलो. […]
एकच सांगतो – त्या दिवसापासून मी ही मालिका पाहू लागलो. हरवत चाललेल्या (म्हणूनच हव्याहव्याशा ) कुटुंब संस्थेतील तीन पिढ्यांचे घट्ट भावबंध मी आवडीने बघतोय. शेवट थोडासा प्रचारकी /उपदेशपर होतो कधी कधी पण वीण मस्त. खूप दिवसांनी चांगली दैनिक करमणूक ! […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions