घुस्मटलेले श्वास झाले रे मोकळे- “गोदावरी” !
“खळ खळ गोदा ” अशा खळखळत्या आवाजात जेव्हा राहुल देशपांडे चित्रपटाच्या शेवटी एक प्रकारे “गोदे ” ची आरती करतो, तेव्हा कुचंबलेल्या मीही थोडा स्वच्छ श्वास घेतला. […]
“खळ खळ गोदा ” अशा खळखळत्या आवाजात जेव्हा राहुल देशपांडे चित्रपटाच्या शेवटी एक प्रकारे “गोदे ” ची आरती करतो, तेव्हा कुचंबलेल्या मीही थोडा स्वच्छ श्वास घेतला. […]
” वीर-जारा ” मध्ये शाहरुख खान किरण खेरला म्हणतो- “माहित नाही, माझ्या आणि तुमच्या देशातील मुले सारखीच असतात का ते? पण एवढं मात्र खात्रीने सांगू शकतो – आई इथून-तिथून सारखीच असते.” […]
मोठ्यामोठ्याने आरती,सोबत शंखनाद तरीही एक सदगृहस्थ विचलित न होता शांतपणे मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. भोवतीच्या गल्बल्यापासून अलिप्त ! अपरिहार्य मावळतीचा मोठा धडा त्यांच्याकडून मला मिळाला. […]
अचानक हा एकमेव चित्रपट की जेथे कवी /शायर /गीतकार गुलजारला काही वाव नव्हता. संपूर्ण चित्रपटात कोठेही काव्य /कविता नाही म्हणून गुलजारने चित्रपटच कवितेत रुपांतरीत केला – एक अशी कविता जिच्या वर्णनासाठी आपण कायम मेहेंदी हसन साहेबांची गज़ल गुणगुणू – […]
एक तरुण लहानपणापासून मातीशी खेळण्यात मश्गुल असायचा. तो संवेदनशील, रागीट पण हुशार होता. काम करताना उपमर्द झाला तर तो तात्काळ प्रतिक्रिया द्यायचा आणि इतरांना अशावेळी हातभर दूर ठेवायचा. एके दिवशी संतप्त होऊन आणि चेहेऱ्यावर स्पष्ट दिसेल असा ताण घेऊन तो त्याच्या मित्राकडे गेला- कारण होतं वरिष्ठांचे त्याच्याशी असंवेदनशील वागणे ! हा मित्र त्याचा प्रशिक्षक होता. […]
काही जीर्ण-शीर्ण पण तग धरून राहिलेली , काही बऱ्या अवस्थेत ! एकेकाळी आमच्या उभयतांच्या प्रकाशित साहित्याच्या कात्रणांचे अल्बम मी केले होते, पण नंतर संख्या वाढत गेल्याने तो नाद सोडून दिला आणि ते सरळ फाईलबद्ध करायला सुरुवात केलीय. […]
सांगलीत अभियांत्रिकी शिक्षणासाठी चार वर्षे होतो,पण रंगभूमी दिनाबद्दल (५ नोव्हेंबर) काहीच माहिती नव्हते.कदाचित तो त्यानंतर साजरा करायला सुरुवात झाली असावी. […]
यशाबद्दल बोलताना हमखास दोन दावे केले जातात- वाटेवर येणाऱ्या प्रत्येक संधीला हो म्हणाल तर यशस्वी व्हाल ही पहिली विचारसरणी ! याउलट ठामपणे नकार देता आला तर आयुष्यात बरंच काही इप्सित साध्य होऊ शकतं असं मानणारा दुसरा गट! […]
एकेकाळी जीवन किती सोपे होते आणि त्याचे प्रतिबिंब ज्यात पडायचे ते चित्रपटही किती हृदयस्पर्शी होते याचे उदाहरण म्हणजे “खुशबू” .कोठलाही संदेश नाही, भाष्याचा आव नाही तरीही हा ” भावपाशांचा दस्तावेज ” मनाचा एक कोपरा व्यापून राहतोच. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions