कॅथेटर (कथा)
‘हॅलो, सुनील… कसा आहेस? काय म्हणतात अण्णा? बरंय ना सर्व…’ नेहमीचेच प्रश्न, त्याला नेहमीचेच उत्तर देऊन सुनीलने फोन कट केला. नुकताच ऑफीसमधून आला होता. पायमोजे काढून हातपाय धुऊन अण्णांच्या खोलीत गेला. अर्धांगवायूने त्यांना कायमचे अधू बनवले होते. स्वत:ला काहीच हालचाल करता येत नव्हती. बोलताही येत नव्हते. सुनील रोज सकाळ संध्याकाळ त्यांना व्हिलचेअरवर बसवून मागच्या अंगणात चक्कर […]