बकुळीची ओंजळभर फुले
बकुळीची ओंजळभर फुले, तू देतां हातांत,– विसरून आपुले भान सारे, उभी राहिले अंगणात,–!! सुवास त्यांचा आसमंती, जरी ती असती ओंजळीत, बाहेरील जगाहून अधिक, दरवळ उरला माझ्या मनात,–!!! चोरटी ती भेट आठवे, लज्जेचे पांघरूण भोवती, संकोचांचे किती कब्जे, आज स्मृती मनी खेळती,–!!! तू हाती हात घेता , मी जशी फूल झाले , पाकळीगत नाजूक, बहरून कशी उठले,–!!! […]