नवीन लेखन...
Avatar
About हिमगौरी कर्वे
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

असे दान द्यावे की

असे दान द्यावे की, समोरचा अचंबित व्हावा, मापे भरून ओतावे, हात ओसंडून वहावा, करावे रक्तदान सारखे, रुग्णांसाठी ते जीवनदान, अन्नदानासारखे पुण्य नसते, भुकेल्याला करते तृप्त, विद्यादान श्रेष्ठ दान, सरस्वती प्रसन्न होई, दुसऱ्याला दिल्याने ज्ञान, आपुले बघा वाढत जाई कला दान करता आपण, निर्मितो एक कलाकार, सेवा तिची करत करत, जिवंत,ठेवेल कला तर , अवयव दान केल्याने […]

ब्रम्हांडातील ग्रहतारे

ब्रम्हांडातील ग्रहतारे, दुरून मजसी दिसती, सारे सवंगडी माझेच, राहती दूर अंतरी,–!!! नाव माझे वसुंधरा, माझ्यावरच जगते सृष्टी, सृजनाची किमया न्यारी, पाहता पाहता झाली मोठी,–!!! खाली मी एकटी, एकाकी, आभाळा पाहत राहते, भास्कर करतो वंचना तरी, सारखी सहज सहत राहते,–!!! सहनशीलता का माझ्यागत, सांगा आहे कोणामध्ये, अंतराळातून वेगळे काढले, दुःख माझ्या काळजामध्ये,–!!! माता म्हणून स्वीकारले, मी माझे […]

धागा धागा मिळून

धागा धागा मिळून, बांधले,खास घरटे, फांदीचा आधार घेऊन, उभ्या झाडास लटकवले, एक चोंच करी किमया, केवढी मोठी कारागिरी, पिल्लांस सुरक्षित करण्यां, माय बापाची चाले हेरगिरी, घर मोठे प्रशस्त हवेशीर, वारा चारी बाजूंनी वाहे, निसर्ग सान्निध्यातले, वाटते मोठे आरामशीर, अंडी घालून ती उबवती, वाट जन्माची पाहती, कारागीरच ते नव्या उमेदी, दार घरट्याचे असे बांधले, सहजी कोणी उतरू […]

ठेवणीतल्या आठवणींचे करावे तरी काय

काल माझ्या “शीघ्रकाव्य” नावाच्या ग्रुपमध्ये मी “आठवण” हा शब्द दिला होता. त्यासाठी मी केलेली एक चारोळी. हाच विषय घेऊन मी कविता पुढे केली आहे. पहिल्या चार ओळी हीच चारोळी आहे. ठेवणीतल्या आठवणींचे, करावे तरी काय, किती वण ठेवून जाती, आठवांचे काय जाय–? स्मृतींच्या इंगळ्या डंसता, भूतकाळाचे मोहोळ फुटते, असेच त्याचे वर्चस्व सारे, तनी मनी येऊन बसते,–!!! […]

द्व्यर्थी,तत्वज्ञानात्मक

द्व्यर्थी,तत्वज्ञानात्मक, — देहातून आत्मा सुटावा. घे स्वैर भरारी, माझ्या देखण्या पाखरा,— बद्ध पंख हे उचंबळती, सोडून ही बंदिस्त कारां,— पिंजर्‍याचे दार लागतां, जीव तुझा घुसमटे, स्वातंत्र्याच्या फोल कल्पना, सर्वच विचारा खींळ लागे आतल्या आत जीव तडफडे, सीमित जागा, नुसताच हिंडे डोळे भिरभिरत कसा शोधशी, तू आपला मुक्तपणा, –!!! जो येईल तो बोलू बघे, इथेतिथे उगा हात […]

हर्ष उल्हासाने मन नाचले,

हर्ष उल्हासाने मन नाचले, मन भिंगरी होऊन फिरले, पुत्रजन्माने अंत:करण किती, हर्षभरीत होऊन गेले,–!!! इवले इवले हात पाय, अन् टपोरे बाळाचे डोळे, रंग गोरापान आणि वरती, केसही काळे कुरळे,–!!! छोट्या जिवांस पाहून, मात्र मन हरखून गेले, किती नवससायास, केवढी व्रतवैकल्ये, जो सांगेल तो उपाय , जीव टाकुनी सारे केले ,–!!! हे कोणत्या जन्मीचे, पुण्य माझे फळां […]

तूच माझी राधिका

तूच माझी राधिका, तूच माझी प्रेमिका, मोहिनी माझी तू , तूच माझी सारिका, –!!! मुसमुसते प्रेम तू , सौंदर्य ओसंडून वाहे, मदनाची रती तू , भित्र्या डोळ्यांनीच पाहे ,–!!! कमनीय सिंहकटी तुझी, बाहूत माझ्या सामावे, लाल कोवळे ओष्ठद्वज, डाळिंबीची जणू फुले,–!!! मोहक बांधा तुझा, जाता-येता खुणावे , कुंतलाचे मानेवर ओझे, पाठीवरचा तीळ झाके, –!!! आरस्पानी रंग-गोरा, […]

नाती- गोती कसली

नाती- गोती कसली,? करती कशी रक्तबंबाळ, जीव’च नाही, आत्माही, होती सारेच घायाळ,–!!! कुठले मित्र,कसले सखे, कशाशी खातात मित्रत्व, स्वार्थ भांडणे वाद ,— एवढीच जगण्याची तत्वं,–!!! कसली नीती कशाची मत्ता, एक दुसऱ्याचा गिरवी कित्ता, खरेपणाची बूंजच नसता, असत्याचीच इथे सर्व सत्ता,–!!! माझी पोळी, तुझेच तूप, नव्हे, तुझी पोळी तुझेच तूप, झाले माझेच ते,तू कितीही खप, तू खोटा, […]

अन्यायाचा अंधक्कार माजतां

आमच्या नितीन नांदगावकर साहेबांवर केलेली एक कविता. ती वाचून विषयाचा संदर्भ आपणास लागेलच. धन्यवाद. अन्यायाचा अंधक्कार माजतां, एक हात पुढे येतो,– जुलुमांच्या बुजबुजाटां, तो इतिश्री देतो,–!!! कुणी रडे, कुणी कळवळे, कुणी आपल्या जिवाला खाई, अत्याचारांचे रान माजता, कुणी एकदम हाय खाई,–!!! असा हा:हा:कार होता, मदतीस येईना कोणी, वाली कोण आपुला आता, जनता दहशत घेई,–? जिकडेतिकडे सामान्य […]

असीम, अपार, अमाप

असीम, अपार, अमाप उदंडा, कुठून आणावे मापदंडा, विशाल विस्तीर्ण जगड्व्याळां तूच बनतोस गुरु आभाळा-! तुझ्यासारखा नाही दाता तुझ्यासारखा नाही त्राता, तूच एकटा तुझ्यासारखा, अतुल अजोड तूंच अनंता,–!! तूच घालशी जन्मा, पृथ्वीवरील संजीवनी, तूच राखीशी जलसाठा , सांभाळुनी अजस्त्र मेघां,–!!! तुझ्यातूनच उठते दामिनी, तूंच निसर्गाची करणी, तूच देशी तूच सावरशी , धरेवरील अखिल चराचरा,–!! वास करे भगवंत […]

1 18 19 20 21 22 32
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..