दोघे एका डहाळीवरच झुलू
दोघे एका डहाळीवरच झुलू,निसर्गाचे ,देणे किती पाहू, बघ, रसरशीत खाली फळे, दोघे मिळून चवीने खाऊ,–!!! पक्ष्यांची जात आपुली, निसर्गमेवा”आपुल्याचसाठी, मानव त्याचा बाजार मांडे, निसर्गराजा, फिरवी कांडी, एका वृक्षा,– किती फळे, रसाळ,गोड,चविष्ट मधुर, तुझ्यासमवेत स्वाद वाढे, फळ बने आणखी रुचिर, प्रेमसंगत वाढून आपुली, एकमेकांचे उष्टे’ खाऊ,–!! त्यागातच प्रेम असते, सखे, दुनियेस दाखवून देऊ,–!! दोन “सांसारिक” जीव आपुले, […]