जगावे कसे पक्ष्यासारखे
जगावे कसे पक्ष्यासारखे, आभाळी स्वैर उडणारे, ध्येय आपुले दिसताच, पुन्हा जमिनीवर उतरणारे,–!!! जगावे कसे केवड्यासारखे, धुंद, मोहक वशीकरणाने, समोरच्याला ताब्यात घेणारे,–!!! जगावे कसे कापरासारखे, स्वत:स अर्पण करुन, ज्वलनही सोसणारे,– ओवाळून ओवाळून , त्यात आनंदें संपणारे,–!!! जगावे कसे चित्त्यासारखे, संकटाच्या थेट भेटीस जाणारे, निडरतेने दबा धरुन, ताकदीने हल्ला करणारे,–!!! जगावे कसे “अत्तरासारखे*, स्वत: सुगंधित बंदिस्त राहून, दुसऱ्याला […]