नवीन लेखन...
Avatar
About हिमगौरी कर्वे
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

ओंजळभर मोती

ओंजळभर मोती, आई तुझ्यासाठी, कष्टलीस ग बाई, सारखी संसारासाठी,–!!! ओंजळभर सोनचाफा, आई तुझ्यासाठी, पोळल्या जिवाला गारवा, मिळेल तुझ्यापाशी,–!!! ओंजळभर मोगरा, आई तुझ्यासाठी, सौंदर्यातील सुगंधाने, आत्मिक दुवा साधण्यासाठी,-!! ओंजळभर चंदन, आई तुझ्यासाठी, उगाळून झिजलीस, आमुच्या भल्यासाठी,–!!! ओंजळभर मरवा, आई तुझ्यासाठी, सारखी फुलत राहशी, तूच आमुच्यासाठी,–!!! ओंजळभर अश्रू, आई तुझ्यासाठी, किती झालीस रिक्ती, देणीघेणीअजून चालती,–!!! हिमगौरी कर्वे.©

निळ्या मखमली ढगांवरती

निळ्या मखमली ढगांवरती, चला स्वार होऊ,— डोळे भरून ही दुनिया, पहात पाहत पुढे जाऊ,— थंडगार हवेत त्या, मेघांचे ओढून शेले, हळूच दबकत, लपतछपत, सूर्यापासून दूर होऊ,— उबदार त्या वातावरणी, अलगद खेळत राहू, मस्तमौला जगत जगत, वरून डोकावून पाहू,— खाली दिसती पर्वतरांगा, नद्या कशा वाहती, पर्वताच्या कुशीत कसे, धबधबे खाली ओसंडती,— थेंबांची नाजूक नक्षी, कोसळते वरून खाली, […]

मुक्त अनुवाद

मागेन हिशोब तुझ्याकडे, कधीतरी माझ्या एकटेपणाचा, सुरकुतलेली पुस्तकातली फुले, देतील साक्ष; नि सांगतील तुलाच , आपल्या ओठांवर, बघ ते गुलाब ठेवून, सुगंधित निघेल ग अत्तर, सुरकुतलेल्या पाकळ्यांमधून , आपल्या प्रेमाचं, त्या विफल प्रेमाचा, करून टाक सौदा, प्रेमातल्या आणाभाकांचाच व्यवहार*,—!!! हिमगौरी कर्वे.©

नाते प्रेममयी , विश्वासदायी, नाते जिवीच्या जिवलगी

नाते प्रेममयी , विश्वासदायी, नाते जिवीच्या जिवलगी, दाखवी आपुलकी, नुरणे सलगी,–!!! धागे मैत्रीचे, धागे जिव्हाळ्याचे, धागे आपुल्या सुसंवादाचे, धागे सहकार्याचे,धागे अंतराचे घट्ट विणी,–!!! बंध रेशमी, नसावे तू अन् मी, द्वैतातून अद्वैत इतुकी एकी, असे आत्मिक एकजिवी, ठाम गोडी ,–!!! परस्परा संकटी, एकमेका सहकारी, नसावी बिलकूल दुरी, आपुल्या जीवनी, अशी दोस्ती,–!!! माझ्यात तू अन तुझ्यात मी, प्रेमभरली […]

शान्त समईत जशी वात

शान्त समईत जशी वात,तशी समाजात स्त्री जात, जळून जळून प्रकाश देत, क्षणिक फक्त मोठ्या होत,–!!! पणतीची ज्योत तशी, आमुची ही असे जात,– जगच छोटे भोवतालचे,– स्वयंप्रकाशी मोठे करत, लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत, मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,–!!! नंदादीपातील जशी ज्योत, स्त्री तशी तिच्या संसारात, हळूहळू अगदी तेवत,–!!! दुसऱ्याला प्रकाशमान करत,–! निरांजनातील छोटीवात, संसारासाठी […]

कुसुमे कल्पनांची

कुसुमे कल्पनांची, तुझ्या चरणी वाहिली, शब्दांची मांदियाळी, तुजसाठी मांडली,—!!! अर्थपूर्ण रचनांचे, हार तुज घातले, रसिकांची पावती, तुज चरणी अर्पियली,—!!! प्रतिभा देवी तुला वंदिते, दिनरात कशी मी, वरदहस्त तुझा राहो, इतुकी चरणी विनंती,—!!! हात माझे “थोटेच” की, तुझ्या “यथासांग” पूजेसाठी, “चूकभूल’ घडता देवी , लेकरू” म्हणुनी पदरात घेई,—!!! काव्याची सर्व बंधने, दिली मी झुगारूनी, भावली ती कविता, […]

सुधांशू येता गगनी

सुधांशू येता गगनी, चांदण्या चमचम करती, धरेवरती रात्र काळी, रानकेवडे घमघम करती, आकाशी पखवाज वाजती, एकत्र येऊन ढग खेळती, रात किड्यांची “धांदल” होई, वाट काढण्या पृथ्वीवरती, “ओलेतेपण” या झाडांवरी, काळ्याशार सावल्या पडती, असंख्य काजवे वाट दाखवती, निसर्गाची धरेवर दीपावली, किर्र किर्र””_ आवाज करती, रात किडे लगबग”” करती, वरती चांदण्या येती जाती, कुणास ठाऊक कुठे भ्रमंती, वाट […]

आशेशी संवाद

कापलेले पंख अन्, तोडलेले हातपाय, विचारेना इथे कुणी, देईना धरणी ठाय,–!!! काय करू, जाऊ कुठे , मन विषण्ण होई,— सांगायाची कोणाला आपुली कर्मकहाणी,–!!! जग सारे पसरलेले, चालते आहे एकटी, स्थिती अगदी अनवाणी, रणरणत्या वाळवंटी,–!!! ‌पाखरा किती गोंडस तू, गोडुली तुझी वाणी, आधार देई मम बुडती’ला, देऊन काडी काडी,–!!! *निराशेच्या गगनीही, आशेचा पक्षी उडे, संगतीला मी तुझ्या, […]

चला, आठवणींच्या गावा जाऊ

चला, आठवणींच्या गावा जाऊ, स्मृतींचे हिंदोळे झुलवत पुन्हा एकदा लहान होऊ, हाती हात मिळवत,–!!! आठवांचे गावच रमणीय,—!!!! किती नांदती सगेसोयरे, हासुन आपले स्वागत करती, त्यात बालपणीचे वडीलधारे,–!!! शाळेतील शिक्षकांच्या हाती, मुळीच लागायचे नाही, त्यांनी केलेल्या कठोर शिक्षा, काहीच आठवायचे नाही, आठवावा तो निरागसपणा, निष्पाप कोवळे ते वय , अशावेळी हमखास येते, मैत्रिणींची खूप सय, कधी लुटूपुटूची […]

जीवनात किती रंग

जीवनात किती रंग, पहावे,अन उधळावे, सुख दुखांचे सोहाळे, किती साजरे करावे ,–!!! विविधरंगी मनसोक्त जगावे, मिसळून त्यांच्यात तसेच होणे, पाण्याचाही रंग स्वीकारे, सूज्ञही किती शहाणपणे,–!!! अनेक अंगे जीवनाची, कशी निरखून पहावी, कंगोरे त्यातील अनुभवत, पखरण पैलूंचीच करावी,–!!! बालपणाचा रंग तो, किती निर्व्याजपणाचा, कुठला नाही मुलामा, फक्त पारदर्शीपणाचा,–!!! लाल हिरवा गुलाबी, पिवळा केशरी जांभळा, आयुष्य नवे ,हरेक […]

1 29 30 31 32
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..