नवीन लेखन...
Avatar
About हिमगौरी कर्वे
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

वेगळ्या दृष्टीने

पाठ राख घन:शामा,मी तर तुझी प्रियतमा,–||१|| साथीने तुझ्या गोकुळ सोडले, अनया सोडून तुज वरले, संसार सारा मोडून आले, पोहोचले आता निजधामां,||२|| प्रीती भक्तीने झपाटले, माझ्यात मी नच राहिले, कृष्णा तुज सर्वस्व वाहिले, लौकिकाची केली न तमा,-||३|| अलौकिक नाते आपले, एकरूप दोन जीव जाहले, तनामनांचे धागे जुळले, कृतार्थ होताना अशा संगमा,-||४|| ढगही सारे भोवती जमले, आजूबाजूस फुलली […]

या भवंसागरातुनी

या भवंसागरातुनी,तारीशी ना रे कान्हा, भोवती निळ्या आभाळी, तूच भासशी राणा,–!!! संसारसागरात भटकती, अनेक हतबल जीव ना,–? हात त्यांना नकळत देशी, करत आपला जादूटोणा,–!!! सागरी या सुखकमळे फुलली, मोहक वाटती, गुलाबी रंगा, दर्शन त्यांचे अधुनी -मधुनी, फक्त पाठ राख श्रीरंगा,–!!! भासतसे सुख फुले उमलली, क्षणभंगुर या जीवना, उमलून फुलती ,कोमेजती, शेवट ठेवती मात्र तरंगा,–!!! अदृश्य ही […]

सावल्यांचा खेळ चाले

सावल्यांचा खेळ चाले, दिवस आणि रातीला, माणसाला संगत मिळे, त्यांचीच हो घडीघडीला,–!!! पहाटेच्या प्रहरी उगवे, आवरण सारे धुक्याचे, सोबत देत माणसा, भोवती सारखे नाचे,–!!! सूर्यराज उगवते, खेळ चालू उन्हाचा, पायात सारखे येऊ पाहे, दूर कसा करशी मनुजा,–!!! समय मध्यान्ह ये , सावली जडते पायाला, जिथे जाई माणूस तिथे, कवटाळी ज्याला-त्याला,–!!! संध्याकाळ हळूच येते, घेऊन संधिकालाला, सावली […]

श्रीमंत योगी, जाणता राजा

श्रीमंत योगी, जाणता राजा, श्री शिवछत्रपतींना त्रिवार वंदन,- श्रीशिवराय छत्रपती,अजून आठवती,लोक पहा आजमिती,– होsssss जीssss जीssssजी, रयतेस अभय’ तरी दरारा, परस्त्री’ माता, आपुल्या मातेचा आदर करती होssss जीsss जी, आज्ञेत राहून तिच्या, सकल कारभार केला,राज्यात पहा, सर्वधर्मसमभाव’ पाहती होssss जीssss जीssss‌जी,-++ छत्तीस वर्षे गनिमाशी झुंजला, जातिभेद झुगारुन एकोपा साधला, शक्ती,युक्ती,नीती,रीती,भक्ती होssssजीsss जीsss जी,-++ दगडधोंड्यात जागवली अस्मिता […]

या कातरल्या क्षणांना

या कातरल्या क्षणांना,सय तुझी येते,– उन्हाची तप्त काहिली, चटकन् दूर होते, वारा धुंद वाही, ढग जाती प्रवासी, अधूनमधून बिजलीही, उगा आपुले दर्शन देई, अशा वेळी आठवे मज, सोनेरी प्रभेची सांज, याच समुद्रकिनारी, वाजली मिलनाची गाज, नभ सुंदर सोनबावरे, होते भेटीस साक्षी, कूजन करीत बागडती, पक्षी आनंदें वृक्षी, किनारा दूरवर तटस्थ, उभ्याने राखी सागराला, मिलनाची किती उदाहरणे, […]

मन अथांग सागर

मन अथांग सागर, उफाळत्या लाटांचा, मन आवर्तनी भोवरा, सखोल पाणथळाचा, –||1|| मन बिंदूंचे अवकाश, विस्तीर्ण मन पसरट, भावनांचे उठती कल्लोळ, अतुल आणि अलोट,–||2|| मन पाण्याचा डोंगर, एकावर एक पार, शुभ्रतम* भासे चढ, *निळसर पण उतार,–||3|| मन किरणी प्रभाव, झेलत साऱ्या दिनभर, सोनेरी कलत, झुकत, आभाळ उदंड त्यावर,–||4|| मन समुद्री वादळ, वारे अखंड वाहत, जीवाची नौका चालण्या, […]

आईच्या संगत बसलो उन्हात

आईच्या संगतबसलो उन्हात, बाहेर उबेत, थंडी घरात, सकाळचा प्रहर, जीवास आराम, नाही काम धाम, बसलो निवांत, बागेच्या फाटकात, अवधान ठेवत, आईचे संरक्षण, मग काय वाण-? मला ते मिळत, मी निर्धास्त,–!!! आई बिनधास्त, नाही डरत, लोक घाबरत, मी हसत,–!!! कवडसा उन्हात, त्यात खेळत, जरासा थकत, आईस बिलगत,–!!! © हिमगौरी कर्वे

झरा वाहतो पाषाणातून

झरा वाहतो पाषाणातून, भोवती सारे खडक, निसर्गाच्या सान्निध्यात, झरणे त्याचे बेधडक, निर्धास्त तो उगमापासून, चोखाळत आपली वाट, निखळ निर्मळ निरामय,— सारखा पुढे पुढे धावत,–!!! भीती ना कुठली अंतरात, सहजी अगदी नाचत उडत कठीण त्या दगडांमधून, उत्फुल्ल होऊन मार्ग काढत, रेषा बिंदूंच्या साऱ्या रेखित, मार्गक्रमण करत ठराविक, तुषार कुठले मोती ठरत, शुभ्र पांढरे आणि सफेत, झुळुझुळु सारखा […]

वस्तीतल्या दिव्यांच्या

वस्तीतल्या दिव्यांच्या,भाळी काय आले,–? उघडे –वाघडे घरदार, पाहून जीव निमाले,—- उजेड देत गरीबा, सगळेच ते दमले, ओळीने घराघरात, वातावरण अंधारलेले,— निवारा फाटका तुटका, झोपडे मोडकळलेले, आभाळाचाच आधार आता, जसे काळीज फाटले,—!!! कण-कण प्रकाशाचा, आतून कसा थरथरे, काही त्यास कळेना, वाढून काय ठेवले,–? आईस येई कळवळा, रिकामे पोट पोरांचे, करू तरी काय आता, पेचाने हृदय द्रवले, —!!! […]

किती राहिले अंतर

किती राहिले अंतर,आपुल्या मनामनात, पडला केवढा दुरावा, दोघांच्याही काळजात, — कित्येक योजने तू दूर, हाक तेथून मारतोस, मुक्या मनातील आर्त, उगीच का छेडतोस,—!!! दूर जाता, जवळ अधिक, नियतीचा का असे डांव, उभा राही पेचप्रसंग, प्रेमिकांना मात्र घांव,–!!! उलते सारखी जखम, बरी,तरीही बंबाळ, कल्पनांना बसे छेद, वास्तवाचीच जळजळ, –!!! गलबले आत जीव, वाटते तुझीच ओढ, एकदा तो […]

1 3 4 5 6 7 32
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..