नवीन लेखन...
Avatar
About ॐकार जोशी
ॐकार जोशी हे गमभन यय मराठी सॉफ्टवेअरमुळे सर्वांना परिचित आहेतच. गेली अनेक वर्षे गमभनच्या माध्यमातून आपण ऑनलाईन लिहित आहातच. मात्र ॐकार हे एक संवेदनशील कवीसुद्धा आहेत हे फार कमी जणांना माहित असेल....
Contact: Website

तुझा उपयोग नाही काम झाल्यावर

तुझा उपयोग नाही काम झाल्यावर तुला उमजेल का आराम झाल्यावर ? पुढे घेऊन जाते सायकल साधी कधी रस्त्यात ट्राफिक-जाम झाल्यावर तुला समजेल बघ आहे किती सुंदर ! तुझे आयुष्य इन्स्टाग्राम झाल्यावर नवे खाते, नवा डी.पी., नवा नंबर विसर ओळख जुनी; बदनाम झाल्यावर तुझा आवाज बाकी गोड आहे; पण नको बोलूस तू बेफाम झाल्यावर बदल घडला जरी […]

भिजलेली रास खडीची

भिजलेली रास खडीची, गंजत पडलेले पत्रे निसरड्या पायरीवरती हुंगत बसलेले कुत्रे कचरापेट्यांना आली बुरशीची दमट नव्हाळी कावीळलेल्या भींती आता झाल्या शेवाळी बिथरला डांबरी रस्ता, बिचकली मातकट धरती विटकरी गांडुळे आली माना वेडावत वरती मग पागोळ्यांच्या गोळ्या टपर्‍यांवर तडतड करती वर चहाळ वाफा आल्या की मेणकापडे चळती उंबर्‍याजवळ दिसणारी वाळवीच तरणीताठी अन कुरबुरण्यात उलटली ह्या बिजागरींची साठी […]

जरा कमी, पण झालो होतो

जरा कमी, पण झालो होतो आपणही बेशरम एकदा शांत आहे तसे जवळजवळ चालला दूर आवाज किती वाहते आहे प्रकाशाची नदी विरघळे काळोख दोन्हीकाठचा तुझी काया सनातन रापलेली जणू बसले थरावर थर उन्हाचे तुझी जरा चौकशी करावी म्हणून आत्ताच फोन केला तुझ्या वॉलवर महिनोन्महिने का आहे रखरखाट इतका विटलो, विरलो जितका मी वापरला गेलो खूप चांगला होता […]

बेफाम

तुझा उपयोग नाही काम झाल्यावर तुला उमजेल का आराम झाल्यावर ? पुढे घेऊन जाते सायकल साधी कधी रस्त्यात ट्राफिक-जाम झाल्यावर तुला समजेल बघ आहे किती सुंदर ! तुझे आयुष्य इन्स्टाग्राम झाल्यावर नवे खाते, नवा डी.पी., नवा नंबर विसर ओळख जुनी; बदनाम झाल्यावर तुझा आवाज बाकी गोड आहे; पण नको बोलूस तू बेफाम झाल्यावर बदल घडला जरी […]

तलम धागा

कळेना चालला आहे तुझा त्रागा कशाला कधीचा राहिला आहेस तू जागा? कशाला ? जिथे चिटपाखरूही फारसे फिरकत नसावे मला बोलावते आहे अशी जागा कशाला ? तुलाही वाटले होतेच की हे शेवटाला – कुणाला वावगे वाटेलसे वागा कशाला ! किती फुललेत रस्ते दाट गर्दीने सभोती हव्या आहेत लोकांना तरी बागा कशाला ? असे झाकायचे आहे खरोखर काय […]

हे तुझ्या हातात का नाही

शक्यता अजिबात का नाही ? देव अस्तित्वात का नाही ? मोकळा असतो बर्‍यापैकी वेळ जाता जात का नाही ! चांगली ही, छान तीही पण.. पण तरी ती बात का नाही ? काय आपण बोललो होतो हे तुझ्या लक्षात का नाही ? लागला बाजार सौख्यांचा एकही स्वस्तात का नाही ? पिंजर्‍याच्या आतला पक्षी खात किंवा गात का […]

वाटते फार अपमानितासारखे

वाटते फार अपमानितासारखे वागवे शहर विस्थापितासारखे रोषणाई प्रखर लखलखे रात्रभर हिंडते चांदणे शापितासारखे वाढले जसजसे वय, उमगले तसे – राहिले बालपण संचितासारखे नागवी भूक धर्माप्रमाणे जणू लाघवी पोर अन् प्रेषितासारखे काम झाल्यावरी मी घरी पोचतो, जेवतो, झोपतो आश्रितासारखे पूल चोखाळतो वेगळी वाट अन् पाहतो काठ प्रस्थापितासारखे ॐकार जोशी

फोन उन्हाचा

रोजच येतो फोन उन्हाचा पण नंबर अननोन उन्हाचा घड्याळातल्या काट्यांसोबत बदलत जातो कोन उन्हाचा वसंतपंचम वाटत नाही हा तर काळी दोन उन्हाचा शोधत आहे घर कौलारू छोटासा चौकोन उन्हाचा स्फोटक वातावरण केवढे ! कुणी प्रसवला क्लोन उन्हाचा ? चटका-चटका वेगवेगळा जो न उन्हाचा, तो न उन्हाचा – ॐकार

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..