साधीभोळी माणसं
गावातील अतिशय प्रामाणिक माणुस, दिलेला शब्द पाळणारा सत्यवचनी माणुस जर कोण असेल तर तो म्हणजे विष्णू गोमा..मी त्याला विष्णू नाना या नावानेच हाक मारतो.आता त्याचे वय जवळजवळ ८५ असेल. […]
गावातील अतिशय प्रामाणिक माणुस, दिलेला शब्द पाळणारा सत्यवचनी माणुस जर कोण असेल तर तो म्हणजे विष्णू गोमा..मी त्याला विष्णू नाना या नावानेच हाक मारतो.आता त्याचे वय जवळजवळ ८५ असेल. […]
आजकाल प्रत्येक गृहिनीला संध्याकाळी कोणती भाजी करावी. किंवा कोणता स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न असतो.शहरात तर सुट्टी असेल तर सर्रास लोक ढाब्यावर जेवायला जातात. त्यात मीही एक. ढाब्यावर जायला नकोच वाटते.त्याच त्या पनीरच्या भाज्या?? कोल्हापुरी व्हेज,व्हेज तिरंगा,स्टार्टरला पनीर चिल्ली,सोयाबीन चिल्ली,मसाला पापड. … . नुसता विचार जरी आला तरी असलेली भुक निघुन जाते.परंतु घराच्या किंवा मित्रांच्या आग्रहामूळे […]
खुप दिवसातुन गावाला दोन तीन दिवस राहण्याचा योग आला होता. सकाळी अंघोळ झाल्यावर चहा घेत असतानाच मित्र काशिनाथ आला.त्याला चहा दिला.चहा पित असतानाच तो म्हणाला.आज काय काम आहे का तुला?काम नसेल तर चल रानात जाऊया..मध कुठे भेटते का पाहू…रानात हे शब्द उच्चारताच मी लगेचच होकार दिला.माझ्याकडे पाण्याची कापडी पिशवी आहे त्यामध्ये पाणी थंड राहते.मी ती घेऊन […]
सन १९९८ मधला श्रावण महिना…नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत…. ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर […]
नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते. […]
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अजुनही आरोग्याच्या म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नाहीत.सन १९८९ साली डेहणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहीली.व सन १९८० साली दवाखाना सुरू झाला.परंतू १९८१ पासुन आजतागायत ठराविक नर्स व आरोग्य सेवक सोडले तर दवाखान्याचा कोणत्याही पेशंटला उपयोग झाला नाही.आला पेशंट डाँक्टर नाहीत,…आला पेशंट गोळ्या औषधे नाहीत,…आला पेशंट येथे उपचार होणार नाहीत.पेशंट पुढे […]
धर्माबुवा तळपे म्हणजे जुन्या काळातील भजनसम्राट. जबरदस्त दैवी आवाज व तितकेच हार्मोनिअमची मधुर सुरावट.धर्माबुवांना ओळखत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.. आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यात जुने लोक त्याना पेटीमास्तर या नावानेच ओळखतात. अजूनही त्यांच्या भजनाचा विषय निघाला की लोक भरभरून बोलतात. त्यांचे कौतुक करतात. असा पेटीमास्तर पुन्हा होणार नाही असे बोलतात. […]
ग्रामीण जीवन आठवणी […]
ग्रामीण जीवन यावर माहिती. आता लोक गुरे पाळत नाहीत. दाढ भाजत नाहीत. काही लोक तर शेतीच करत नाही. एके काळचे वैभव लयाला जात चालले आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions