नवीन लेखन...

‘उन्हाळी’ सर्दी

उन्हाळी असो वा हिवाळी; सर्दी ही सर्दी असते. असा विचार स्वाभाविकपणे आपल्यापैकी काहींच्या मनात येईल. आयुर्वेदानुसार मात्र तसे नसते. विविध ऋतूंत होणारी सर्दीदेखील विविध कारणांमुळे होत असते आणि या कारणांनुसारच तिचे उपचारदेखील बदलत असतात. […]

IUI – मुलं तयार करण्याचा कारखाना (?!)

मुळात ‘सुज्ञपणे’ IUI चा उपयोग केला जातो का? याचं प्रामाणिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न ज्याचा त्याने करावा. इथे त्या प्रक्रियेवर सरसकट आक्षेप नसून त्याचा बाजार माजवण्यावर आहे. शरीरसंबंधातून मुलं होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी IUI वा त्यापुढील IVF हे काही मार्ग नव्हेत वा वर उल्लेख केल्याप्रमाणे मुलं तयार करण्याचे कारखानेदेखील नव्हेत. […]

डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे

उन्हाळ्यात विशेषतः देशावर वा कोरड्या प्रदेशांत होणारा त्रास म्हणजे डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे हा होय. बाहेरील तापमानाप्रमाणे शरीराचे तापमान बदलणे आणि आपल्याला वातावरणाशी समायोजित ठेवणे याकडे आपल्या शरीराचा नैसर्गिक कल असतो. […]

काटकसर

आज ज्या वीज आणि पाण्यासारख्या गोष्टींची पैशाच्या मस्तीत आपण काटकसर करत नाही त्या एक ना एक दिवस संपून जातील. ज्या माणसांना दुखावण्याबाबत स्वतःच्याच मस्तीत आपण काटकसर करत नाही ती माणसंदेखील एखाद दिवस आपल्याला किंवा जगाला सोडून जातील. हातात काय राहील याचा विचार करा बरं एकदा. मित्रांनो; काटकसर जिथे शक्य आहे तिथे करा. जितकी जास्त बचत कराल तितकं जीवन सुसह्य असेल. मग ती बचत पैशांची असो वा नात्यांची!! […]

बैठे बैठे सावधान

शाळेच्या शारीरिक शिक्षणाच्या तासाला असं काहीसं ऐकल्याचं आठवत असेल नं? अशी सूचना येताच पाठकणा ताठ करून आणि सावरून बसलं जायचं. बसणं…..आपल्याला नित्यानेमाची असलेली क्रिया. […]

गणिताची भीती

गणित हा अवघड विषय आहे ही भीती आजच मनातून काढून टाका आणि पूर्ण आत्मविश्वासाने या विषयाला सामोरे जा. […]

नैराश्यावर बोलू काही

आयुर्वेदाने ‘निरोगी कोणाला म्हणावे?’ या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले आहे की; ज्याच्या शरीरात दोष, धातू आणि मल हे साम्यावस्थेत असतात. तसेच ज्याची इंद्रिये, आत्मा व मनदेखील साम्यावस्थेत असते ती व्यक्ती निरोगी असते. यातील दुसऱ्या ओळीतला उल्लेख अतिशय महत्वाचा आहे. ‘मनाचे आरोग्य’ हे निरोगी असण्याकरता महत्वाचे आहे असे आयुर्वेद मानतो. १० ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मनःस्वास्थ्य दिन’ साजरा केला गेला. यावर्षी तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Depression; let’s talk ही संकल्पना राबवली आहे. थोडक्यात; ‘नैराश्यावर बोलू काही’!! […]

आयुर्वेदाचे ‘नोबेल’ कनेक्शन

रोसबाश, यंग, हॉल या तीन शास्त्रज्ञांना यावेळचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचा संशोधनाचा विषय होता; जैविक घड्याळ म्हणजेच biological clock. आपल्या शरीरातील सर्व क्रिया/ चयापचय होण्यामागे एक नैसर्गिक घड्याळ कार्य करत असते; ही मूलतः आयुर्वेदीय ग्रंथांत आलेली संकल्पना आहे. […]

कथिलाचं पाणी….सावधान!!

सध्या ‘कथिलाचं पाणी’ या नावाने व्हॉटस्अप वर एक संदेश फिरतोय. काहींनी याबाबत मार्गदर्शन करा असे आवर्जून विचारल्याने लिहित आहे. या संदेशाकडे आपल्याला आयुर्वेद व आधुनिक विज्ञान अशा दोन्ही बाजुंनी पहावं लागेल. […]

बाहुबली आणि आयुर्वेद!

बाहुबली…..भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला एक भवदिव्य चित्रपट म्हणून अजरामर होईल अशी एक कलाकृती. चित्रपटाविषयी अधिक लिहिणार नाही. कारण तो माझा प्रांत नाही. पण आयुर्वेद हा केवळ माझा व्यवसाय-साधन इतकाच मर्यादित नसल्याने आणि तो नसानसांत भिनलेला असल्याने जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसतो तो आयुर्वेदच. तसाच तो बाहुबली पाहतानाही दिसला. तुमच्या समोर तो मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. बाहुबली आणि भल्लालदेव (की […]

1 2 3 4 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..