नवीन लेखन...
Avatar
About सौ. शिल्पा पवन हाके
'वाचाल, तर वाचाल'
Contact: Facebook

न संपणारा प्रवास…

आपण वेगवेगळ्या राज्यात जन्माला आलो तरी आपली मातृभूमी तर एकच आहे ना, एकाच मातृभूमीची आपण लेकरे आहोत मग हा परकेपणा का?? आपल्या देशातील नयनरम्य निसर्गाला टिपण्यासाठी विदेशातून लोकं इथे येतात मग आपण का आपली संस्कृती, निसर्ग सोडून बाहेरच्या देशात फिरायला जातो, त्यातच फक्त आपलं राज्य आणि आपली माणसं ही मानसिकता संपायला पाहिजे. आपला देश आपली माणसं अस व्हायला हवं तेव्हा कुठे आपल्यात एकता निर्माण होईल. […]

एक सैनिक ‘ बाप ‘

एक सैनिक ही बापचं असतो जरी तो घरापासून दूरवर असतो, तुझ्या जन्माचा आनंद ही घेता आला नाही बाप म्हणून गावभर मिरवता ही आले नाही, तुझ्या आठवणीत उश्या खाली रडतो या सैनिकांचं मन कोण भला जाणतो, घरी आल्यावर ओळखशील का ग मला.. बाबा बाबा हाक मारशील ना ग मला.. ना बाहुली ना खेळणी आणली मी तुला आल्यानंतर […]

लढवय्या बापाचा शेवट

… परंतु जनसामान्यांना याची काय किंमत… अहो साधे देवाच्या पूजेत काही चुकलं की आपण देव कोपेल म्हणून दहा वेळा देवा तुझ्या सेवेत कमी झाले असेल तर माफ कर… अस बोलतो… मात्र कोरोना काळात साक्षात देवाच्या रूपात लोकांची सेवा करणाऱ्या कोरोना दुतांच्या जीवाशी खेळतो तेव्हा मात्र देव तुमच्यावर कोपणार नाय का?? देव माणसात ही असतो हे आपण कधी समजणार ??? […]

खोलवर रुजलेल्या ‘वेदना’

देवा, हे लपंडावाच दुष्टचक्र पुरे झालं आता. माझे कान आसुसलेत ‘आई’ अशी हाक ऐकण्यासाठी. मी पुन्हा वाट पाहिन तुझ्या येण्याची. मी पुन्हा स्वप्न रंगवणार तुझ्यासाठी. पण पुन्हा येवून जाऊ नकोस. आता पुन्हा आम्हाला सोडून जाऊ नकोस! […]

भुविका…

मुळात भुविकाचा दोष काय होता??? ती सुंदर होती हा तिचा दोष??? की तिने समीरला नकार दिला हा तिचा दोष…अद्याप समीर फरारच…आपल्या कायद्यात एवढ्या पळवाटा आहेत, तो सापडला तरी त्याला शिक्षा होणार का??? हा मोठा प्रश्न आहे. भुविका सारख्या अनेक निष्पाप तरुणींचा बळी घेणारे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत…… […]

त्या डायरीतला बंदिस्त सैनिक……

रागिणी ती डायरी पाहून विचारात पडली, नचिकेत ने यापूर्वी तिला कधीच या डायरी बद्दल सांगितले नव्हते वा तिनेही कधी त्याच्या जवळ ती पाहिली नव्हती. त्या डायरीत काय लिहिलं असणार या विचाराने तिचं कामात लक्षच लागत नव्हतं. मनात कल्लोळ सुरू होता. स्वतःशीच पुटपुटत ती विचारात गुंतली होती. कसेबसे तिने काम आटोपले आणि डायरी घेऊन ती बेडवर बसली. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..