नवीन लेखन...
Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

कार्डिअॅक कॅथेटरायझेशन – डॉ. वेर्नर फोर्समान

कार्डिअॅक कॅथेटरचा मानवी शरिरावर वापर करण्‍याचे श्रेय डॉ. वेर्नर फोर्समान या जर्मन डॉक्‍टरला जाते. डॉ. फोर्समान यांनी प्रथम मानवी शरिरावर कार्डिअॅक कॅथेटर वापरून पाहिला इतकेच नव्‍हे तर एक्‍स-रे मशीन वापरून त्‍याची प्रतिमाही तयार केली. डॉ. फोर्समान यांची ही कहाणी केवळ रोचकच नव्‍हे तर एखाद्या रहस्‍यकथेप्रमाणे रोमहर्षक आहे. […]

निष्‍णात शल्‍यचिकित्‍सक डॉ. व्हिविअन थॉमस

डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍या जगप्रसिद्ध ‘ब्‍लॅलॉक-टॉऊसिग-थॉमस’ ही उपचारप्रणाली विकसित करण्‍यात ज्‍यांचे मोलाचे योगदान आहे ते व्हिविअन थॉमस! थॉमस, डॉ. ब्‍लॅलॉक यांचे शल्‍यचिकित्‍सेदरम्‍यान सहायक होते. चौतीस वर्ष डॉ. ब्‍लॅलॉक व थॉमस यांनी एकत्र काम केले. डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍या कित्‍येक संशोधनांचा पाया थॉमस यांनीच रचला होता. थॉमस कृष्‍णवर्णी-आफ्रिकन वंशाचे होते. त्‍यामुळे त्‍यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागत असे. ब्‍लॅलॉक यांच्‍याइतकेच […]

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्‍या पहिल्‍या महिला अध्‍यक्ष डॉ. हेलन टाऊसिग

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्‍या पहिल्‍या महिला अध्‍यक्ष डॉ. हेलन टाऊसिग या बालहृदयरोजतज्‍ज्ञ म्‍हणून प्रसिद्ध होत्‍या. जन्‍मतःच हृदयात दोष असणार्‍या बालकांवर हृदयशस्‍त्रक्रिया करून त्‍यांचे आयुष्‍यमान उंचावणारी शल्‍यचिकित्‍साडॉ. ब्‍लॅलॉक यांनी प्रथमतः यशस्‍वी केली व त्‍यानंतर त्‍यांचे नाव सर्वतोमुखी झाले. […]

लहान मुलांवरील हृदयशस्त्रक्रियेचे जनक डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक

लहान मुलांमध्‍ये जन्‍मतः असलेल्‍या हृदयातील दोषावर काम करून ते दूर करण्‍यासाठी एक प्रणाली विकसित करून अनेकांना जीवनदान देणारे डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक विसाव्‍या शतकातील अग्रगण्‍य  शल्‍यविशारद होते. शल्‍यचिकित्‍सेतील भरीव कामगिरीसाठी कित्‍येकवेळा नोबेल पारितोषिकासाठी त्‍यांच्‍या नावाची शिफारस करण्‍यात आली. १९५० सालापर्यंत ब्‍लॅलॉकनी जन्‍मतः असलेला हृदयातील दोष दूर करणार्‍या एक हजारपेक्षा जास्‍त शस्‍त्रक्रिया केल्‍या. […]

अतिदक्षता विभागाचे जनक डॉ. जॉन कर्कलीन

अतिदक्षता विभागात संगणकीकृत निरीक्षणे ठेवणे व तेथील रुग्‍णांच्‍या अतिमहत्त्वाच्‍या चाचण्‍यांवर सतत लक्ष ठेवणे हे आज आपल्‍या ओळखीचे आहे. परंतु अशा प्रकारचा अतिदक्षता विभाग असावा अशी कल्पना मांडून , त्‍याचे प्रारूप कर्कलीन यांनी सुचविले व आज जगभरात ते अंमलात येते आहे. या प्रारूपाच्‍या वापरामुळे रुग्‍णांची काळजी घेणे सुलभ झाले आहे. त्‍याचप्रमाणे शस्‍त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कमी झाली आहे व पर्यायाने कित्‍येकांना जीवदान मिळाले आहे. […]

डॉ. विल्‍फ्रेड बिगलो

दुसर्‍या महायुद्धाच्‍या काळात डॉ. ड्वाईट हार्केन यांनी हृदयावर शस्‍त्रक्रिया करण्‍याची एक पद्धत विकसित केली. या पद्धतीने केलेल्‍या शस्‍त्रक्रियेत प्रथम हृदयाला लहानसे छिद्र पाडण्‍यात येत असे. मग त्‍या छिद्रातून हाताचे बोट हृदयात घालून अरुंद झडप (व्‍हॉल्‍व्‍ह) थोडीशी मोठी करण्‍यात येई. हळूहळू हृदयशल्‍यचिकित्‍सकांना यात प्राविण्‍य मिळाले व अशा शस्‍त्रक्रिया सुलभतेने होऊ लागल्‍या. ही झाली ‘क्‍लोज्‍ड हार्ट’ अथवा आंधळी […]

डॉ. अॅ‍ड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ्

डॉ. अॅ‍ड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ् दक्षिण आफ्रिकन हृदयशल्‍यविशारद डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांनी जगातील पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केली. दुसरी मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करण्‍याचा मान डॉ. अॅड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांच्‍याकडे जातो. ६ डिसेंबर १९६७ रोजी अमेरिकेतील न्‍यूयॉर्क मधील ‘मायमोनिडेस मेडिकल सेंटर’ येथे ही शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी हृदयशल्‍यचिकित्‍सेच्‍या क्षेत्रात अतिशय भरीव कामगिरी केली आहे. प्रस्‍तुत शस्‍त्रक्रिया हा त्‍यांच्‍या शिरपेचातील […]

डॉ. नॉर्मन शुमवे

हृदय-प्रत्‍यारोपणाच्‍या इतिहासात डॉ. नॉर्मन शुमवे यांचे नाव सोनेरी अक्षरांत लिहिलेले आहे. त्‍यांनी अमेरिकेतील स्‍टॅनफोर्ड येथील पहिले हृदय-प्रत्‍यारोपण केले. त्‍याआधी बराच काळ ते यावर काम करीत होते. या विषयावर पथदर्शी संशोधन व कार्य करण्‍याचे श्रेय शूमवे यांच्‍याकडे जाते. डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांनी शुमवे यांच्‍याकडे हृदय-प्रत्‍यारोपणाचे प्रशिक्षण घेतले असे म्‍हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. मानवी हृदय-प्रत्‍यारोपणाची […]

पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड

पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड अशी त्‍यांची ओळख निर्माण झाली असली तरी त्‍यापूर्वी देखील त्‍यांनी महत्त्वाचे संशोधन केले होते. डॉ. बर्नार्ड यांनी धाडसीपणे निर्णय घेऊन ही शस्‍त्रक्रिया केली. अशक्‍य वाटणारी गोष्‍ट त्‍यांनी शक्‍यतेच्‍या आवाक्‍यात आणली. या शस्‍त्रक्रियेला जगात उदंड प्रसिद्धी मिळाली व त्‍याचबरोबर डॉ. बर्नार्डही प्रकाशझोतात आले. […]

वैज्ञानिक व प्रत्‍यारोपण-शल्‍यविशारद डॉ. व्‍हालिदीमीर डेमीखॉव्‍ह

डॉ. व्‍हालिदीमीर डेमीखॉव्‍ह सोव्हिएत युनियन मधील आघाडीचे वैज्ञानिक व प्रत्‍यारोपण-शल्‍यविशारद होते. त्‍यांनी श्‍वानहृदय व फुफ्फुसांचे प्रत्‍यारोपण तर केलेच पण एका श्‍वानमस्‍तकाचे प्रत्‍यारोपणही केले. त्‍यामुळे त्‍यांचे नाव अधिकच चर्चेत आले. त्‍यांच्‍या या प्रयोगापासून स्‍फूर्ती घेऊन डॉ. रॉबर्ट व्‍हाईट यांनी तसाच प्रयोग माकडांवर करून पाहिला. डॉ. डेमीखॉव्‍ह यांनी ‘ट्रान्‍सप्‍लॅन्टोलॉजी’ ह्या शब्‍दाला जनकत्‍व दिले. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..