नवीन लेखन...
Avatar
About प्रकाश तांबे
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

बटाटा वड्याची पूजा

गोर गरिबांची अत्यल्प दरात भूक भागवणारा, लग्नाच्या जेवणावळीत हॉट फेवरिट ठरणारा आणि खवैयांच्या जिभेचे चोचले पुरवणारा हरहुन्नरी बटाटेवडा मला खरोखरच पूजनीय वाटतो. […]

मुखपुस्तिका उर्फ फेसबुक एक्सप्रेस

या मुखपुस्तिका उर्फ फेसबुक एक्सप्रेसमुळेच कित्येक नवीन लेखक, कवी जन्माला आले, माहितीचा प्रसार त्वरित होऊ लागला, निवृत्त आणि एकाकी जेष्ठ नागरिक आणि गृहिणींना हक्काचा विरंगुळा मिळाला, नवनवीन तंत्रज्ञानाशी तोंडओळख होते, वगैरे वगैरे.. […]

तव्यावर झुणका अन् मणक्यावर दणका

बायकोनी बाहेरुन आल्यावर फक्त गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करुन दोघांनी झुणका भाकरीचा आस्वाद घ्यायचा अस सरप्राइज पँकेज होत. बायको वेळेवर आली, भाकरी केल्या आणि माझ्या आयुष्यातील किचनमधील पहिल्या वहिल्या आविष्काराच्या सांगतेची घटिका समीप आली. […]

माझं भाषण

नोबेल पारीतोषिकाच्या वितरण सोहळ्याच्या निमित्तानी अचानक मला बोलायची वेळ आल्यावर वरील संकल्पनेवर आधारीत चार शब्द मी बोलत सुटलो. कुठल्याही शब्दाचा दुसर्‍या शब्दांशीच काय प्रसंगाशीही संबंध नाहीये तरीही बोलण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला…  […]

माझा भाबडेपणा

माझा भाबडेपणा माझ्या सख्या शिक्षकांनीही कधी गांभिर्यानी घेतला नाही. ” कोणाला काही शंका असल्यास आवश्य विचारा ” एवढे फक्त म्हणायचे आणि शंका विचारण्यासाठी मी कधीही हात वर केला की एखाद्या संशयित आरोपीसारख माझ्याकडे बघायचे. […]

खादाड संगीतप्रेमींसाठी

माझ्यासारख्या खादाड संगीतप्रेमींसाठी अज्ञाताकडून दिवाळी भेट…..मला आणि अज्ञाताला उचक्या लागणारच आहेत…पण तुम्ही खाद्यपंगतीचा आकंठ आस्वाद घ्यावा… […]

युरोपायण अकरावा दिवस – टूरचा शेवटचा – रोम – व्हॅटीकन सीटी

संस्कृती आणि वारसा दोहोंची जपणुक या बाबत सर्वच युरोपीय देश आघाडीवर आहेत. इटली देशाची राजधानी रोममधेही हे दिसुन येते. सेवन हिल्समधे वसलेल्या या रोम शहराची पायी टूर करुन टायबर रीव्हर, रोमन फोरम, ट्रेव्ही फौंटन, सर्कस मँक्सीमस, पियाझा व्हेनीझिया, कलोझियम वगैरे ऐतिहासिक पार्श्वभूमी ची स्थळ बघताना जास्ती करुन भग्न अवशेषच बघायला मिळाले. रोम शहरातल्या ब-याचशा इमारती विटकरी […]

युरोपायण दहावा दिवस – पीसा – फ्लॉरेन्स

पाडोवा हॉटेलमाधुन चेकौट करुन आम्ही सर्वांनी जन गण मन चे समूहगान केल आणि तिथून 300 कीमीवरच्या पीसा शहराकडे निघालो. इटलीतील पीसाच्या झुकता मनो-याच्या आसपास अजूनही दोन ऐतिहासिक वास्तू आहेत; एक, बाप्टेस्ट्री जी इटलीतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बाप्टेस्ट्री आहे आणि जीची घुमटासह उंची झुकता मनो-याहूनही थोडी जास्तच आहे आणि दुसर, पीसा कॅथेड्रल. या दोहोंच्या बरोबरच […]

युरोपायण# नववा दिवस – व्हेनिस

इन्सब्रुकच्या ऑलेंम्पीया हॉटेलमधुन पाय काढवत नव्हता पण साडे सातच प्रयाण टाळण शक्य नव्हत. दुतर्फा अप्रतीम सृष्टीसौंदर्याचा नजारा न्यहाळत शेवटी 400 किमीवरील इटलीतील व्हेनिसला निघालो. हिरव्यागार दिसणा-या डोंगरावरची लहानमोठी घरे, हॉटल्स, चर्चेस सर्वकाही अत्यंत प्रेक्षणीय दिसत होत. पर्यटकांसाठी दिलखेचक ठिकाणं म्हणजे काश्मीर, कुलु मनाली, मुन्नार एवढीच नसुन निसर्गानी युरोपातील स्विस, ऑस्ट्रीया, इटली हेही तितकेच तुल्यबळ पर्याय पर्याटकांना […]

युरोपायण आठवा दिवस – वडुज – वँटर्न्स – इन्सब्रुक

काल ल्युसर्न लेकच्या क्रूझवर सर्वांनी खूप धमाल केली आणि उद्या चेकौट असल्याने हॉटेलवर जाउन सामानाची अवराआवर करुन सगळे झोपी गेले. आज सकाळी 8च्या सुमारास झुगपासुन दीड तासाच्या अंतरावरच्या liechtenstein, (अंंदाजे उच्चार लिंच्यटेनस्टाईन) कडे, निघालो. ऑस्ट्रीया आणि स्वित्झर्लंड देशांना जोडणारा आणि भरपूर निसर्गसौंदर्य लाभलेला हा छोटासा देश पर्यटकांच खास आकर्षण आहे. पांढ-या शुभ्र वीरळ ढगांच्या मागुन डोकावणा-या […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..