पुण्यनगरीतील खादाडी
एक खवैया व त्यात खाउपीऊ घालण्यात आनंद लुटणारा या माझ्या पिढीजात स्टेटसमुळे मी राहतो तिथल्या म्हणजेच पुण्याच्या खाद्यसंस्कृतिशी एकरूप झालोय. डोक्यातली वळवळ आणि पोटातली कावकाव यांच्या संगनमताने कित्येक खाद्य चढायांवर मी जीव निछावर केलाय. पुण्यात आज शुक्रवार संध्याकाळ आहे अशी वदंता पसरायचाच अवकाश, बर्याचशा घरी गँसची शेगडी व मँडम यांची द्रुष्टाद्ष्ट चहा कॉफी पुरतीच होत असेल आणि त्या शुक्रवार संध्याकाळपासुन रविवारच्या रात्रीपर्यंत क्षुधाशांतीच्या विविध होमकुंडांभोवती पुणेकर खवैयांची भ्रमंती चालुच असते. […]