नवीन लेखन...
निनाद प्रधान
About निनाद प्रधान
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

किल्ल्यातील मुंबई ते किल्ल्याबाहेरील आधुनिक मुंबई

मुंबई शहराबद्दल बरंच काही लिहिलं-बोललं गेलेलं आहे. त्यात आता ही नवी भर कशाला असं वाटणं सहाजिकच आहे. मात्र या लेखमालेत मुंबईच्या इतिहासाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांकडे नजर टाकण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुंबईतली दळणवळण साधने, रस्तावाहतूक, ट्राम, रेल्वे, टॅक्सी-रिक्शा यापासून थेट आत्ताच्या मेट्रोच्या होऊ घातलेल्या जाळ्याकडे एक नजर टाकलेय. मुंबईतली घरबांधणी आणि त्यातील स्थित्यंतरे, म्हाडा, […]

शॉपिंग कार्ट अर्थात ट्रॉली

मॉलमध्ये गेल्यानंतर ट्रॉली ढकलत शॉपिंग करणं, हे आपल्यापैकी अनेकांना आवडतं. परंतु कोणे एके काळी या ट्रॉलींचा वापर करणं ग्राहकांना अपमान वाटत होता. चातुर्याने केलेलं प्रमोशन आणि बदल यांच्यामुळे ट्रॉली अर्थात शापिंग कार्ट आज कमालीच्या लोकप्रिय आहेत. अमेरिकेतील एका सुपरमार्केटच्या मालकाने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी तयार केलेली ही कार्ट आता सर्वसामान्यांच्या हाती जाऊन विसावली आहे. अमेरिकेतील ओक्लोहोमा शहरात […]

सिद्धिविनायकचरणी २ कोटींचे हारतुरे..

निदान सिद्धिविनायक ट्रस्टने अशा प्रकारच्या उधळपट्टीला थारा देऊ नये. “मन्नत” वाल्याला तेच पैसे ट्रस्टच्या माध्यमातून एखाद्या चांगल्या कार्यासाठी देण्याची विनंती करावी. एवढीच गणेशभक्तांची अपेक्षा असणार. किमान तेवढी अपेक्षा ट्रस्टने पुरवावी. अर्थात ट्रस्टने पुरवली नाही तरी बाप्पा ही अपेक्षा नक्कीच पुरवेल. […]

आशा आणि अपेक्षा..

आशा आणि अपेक्षा या दोन जुळ्या बहिणी…. जिथे जिथे आशा असेल तिथे तिथे अपेक्षा भेटणारच… मनुष्यप्राणी आशेवरच जगतो… आणि सतत कसलीतरी अपेक्षा करतोच करतो.. माणुसच कशाला.. अगदी कोणताही प्राणी तेच करतो.. आपण कोणाकडूनतरी कसलीतरी अपेक्षा करतो.. आपल्याला आशा असते की आपली ती अपेक्षा पूर्ण होईल.. कधीकधी आशा आणि अपेक्षा अगदी १०० टक्के पावतात आणि सहजगत्या प्राप्त […]

कॉर्न फ्लेक्सची जन्मकथा…

मानव हा पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राणी आहे. तो सतत नवेनवे शोध लावत असतो. या शोधांचं कारण म्हणजे मानवाची गरज दिवसेंदिवस वाढत गेली. असं म्हणतात की गरज ही शोधांची जननी आहे. पण जगातल्या अनेक शोधांचा उगम माणसाने केलेल्या चुकांमधून किवा अपघातातून झालेला आहे. अमेरिकेतील दोन भावांच्या विसराळूपणामधूनच शोध लागला फ्लेक्स या खाद्यपदार्थाचा. सकाळी उठल्यानंतर आपली सर्वात पहिली […]

‘सोनी’ची ध्वजा जगभर फडकविणारे ‘नोरिओ ओगा’

संगणक व त्याच्याशी संबंधित लहानमोठी उपकरणे आता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहेत. कॉम्पॅक्ट डिस्क- अर्थात ‘सीडी’ ही त्यातीलच एक. रेकॉर्ड प्लेअरची जागा टेप रेकॉर्डरने घेतली आणि पुढे काही काळातच कॅसेट कालबाह्य़ ठरून त्यांची जागा ‘सीडीं’नी घेतली. संगीत साठवणे आणि ऐकणे हा ‘सीडी’चा केवळ एक उपयोग झाला. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही माहितीचा साठा संग्रहित करण्यापासून तो दुसर्‍याला […]

सचिनच्या फेरारीच्या शुल्काची चर्चा

जुलै २००२ आणि जुलै २००३ मध्ये घडलेल्या दोन घटनांची एक आठवण….. एप्रिल २००२ मध्ये विंडीज दौर्‍यात सचिन तेंडुलकरने सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्याची गौरवपर भेट म्हणून फेरारी या विख्यात स्वयंचलित वाहनोद्योगाच्या कंपनीने त्याला ७५ लाख रुपये एवढ्या किमतीची फेरारी ३६० मोडेना (एंजिन मध्यभागात असणारी दोन लोक बसू शकतील अशी […]

साहित्य संमेलनातील योगायोग

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात डोकावले तर अनेक मजेशीर गोष्टी लक्षात येतात. या संमेलनाच्या आयोजनातून अनेक योगायोगही जन्माला येत असतात. अशाच काही योगायोगांचा आढावा. पहिली पाच संमेलने ग्रंथकार संमेलने या नावाने भरली. या संमेलनांना स्वागताध्यक्ष नव्हता. १९०८ च्या पुणे संमेलनाला प्रथमच स्वागताध्यक्ष लाभले आणि ते होते वा.गो.आपटे. न्यायमूर्ती म.गो.रानडे १८७८ मध्ये पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाचे […]

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करावी लागणे हे भारतीयांचे दुर्दैव

स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहीले. मात्र खरे म्हणजे सावरकर जरी हिंदुत्त्ववादी होते तरीही त्यांनी इतर धर्मांचा नेहमीच आदर राखला. आजच्या तथाकथित बाजारबुणग्या सेक्युलरवाद्यांसारखे नव्हते. आजचे सेक्युलरवादी म्हणजे केवळ हिंदूविरोधी असतात. आपल्या देशात ज्यांना हिंदूंनी निवडून दिले ते स्वत:ला हिंदू म्हणायला तयार नाहीत. दिवंगत राजीव […]

1 2 3 4 5 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..