नवीन लेखन...
प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

मायाबाजार

कुणी विकतं, कुणी खरेदी करतं, पण काही खरेदी करण्यापूर्वी कमवावं लागतं. मग ज्याच्याकडे जे असेल ते जास्तीत जास्त भावात विकलं जातं. कुणी बुद्धिमत्ता विकतं, कुणी सत्ता विकतं, कुणी जरब विकतं, कुणी देवाने दिलेले सौंदर्य विकतं, तर कुणी त्याच्याच शेजारी आपले वैगुण्य घेऊन विकायला बसतं. मायाबाजार चालू राहतो.  […]

नांव देण्याची हौस

या नांवाचा आग्रह केलेला नगरसेवक आज हयात नाही. त्या रस्त्यावरच्या एकाही नागरिकाला ही व्यक्ती कोण माहित नाही. महापालिकेच्या कचेरीत काम करणाऱ्या कुणालाही या रस्त्याच्या या व्यक्तीचं नाव का दिलं माहित नाही. ज्यावेळी हा ठराव झाला त्यावेळची कागदपत्र काढून बघण्यात आली, पण त्यातही त्या व्यक्तीविषयी काहीच माहिती नाही. […]

समोरच्या खिडकीतला तो..

सकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर यायची. कुत्रे भुंकायचे, तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंईऽकुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो. […]

लोकल

पहिला वर्ग असू द्या नाही तर दुसरा वर्ग, इतक्या गर्दीतून तास-दोन तास मेंढरांसारख डब्यात कोंडून तुम्ही प्रवास करता तरी कसा ? आपल्याला तर गुदमरल्यासाखं होतं. परगांवाहून आलेला पाहुणा सांगत राहतो. ‘आम्हाला याची सवय आहे’ मुंबईकर अभिमानाने सांगत राहतो. रोजची दगदग हसत-हसत झेलत राहतो. लोकल पकडण्याचं आणि उतरण्याचं भयंकर दिव्य रोजचं करीत राहतो. […]

तोंडचं पाणी

पळत पळत तो मॅनेजरकडे गेला. पाणी कसं येणार ? सर्व इमारती पूर्ण झाल्यावरच पाणी मिळेल. तोपर्यंत काय ? तोपर्यंत टँकरनं पाणी पुरवठा. रात्री दहा-बारा टँकर आले. इमारतींच्या टाकीत पाणी टाकून गेले. ते पाणी दोन तासात संपलं. रात्रीपर्यंत ठणाणा. रात्री पाणी आलं. लोकांनी ते आपल्या टाक्यांत साठवल. दोन तासात पाणी संपलं. […]

मैदानाचा मृत्यू

सुरुवातीला पोहण्याच्या तलावासाठी तासाला दोन रुपये होते. ते कसेबसे भरुन उन्हाळ्यात का होईना पोरं पोहायला जात. वर्षभर शक्यच नव्हतं. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेला दृष्ट लागेल असा कॉम्प्लेक्स ओसच राहिला. नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने तरण तलाव खाजगी कंत्राटदाराकडे दिला. त्याने तासाची फी १५ रुपये केली. पोरं बाहेरच राहिली.
[…]

चालणारा पोपट

चालणारा पोपट पहिल्यांदाच बघत होतो. त्यााला कधीच उडता येणार नव्हतं. कारण पंखांची टोकं कलात्मक पद्धतीनं कापून टाकलेली होती. उडणारे पोपट बघितले, पिंजऱ्यातले पोपट बघितले. पण चालणारा पोपट पहिल्यांदाच बघितला. […]

गँगमन (कथा)

मैलोगणिक पसरलेल्या रेल्वे रुळांच रक्षण करुन ते व्यवस्थित ठेवायचे. म्हणजे ऊन-पावसात मैलोगणिक चालण्याची शारिरिक क्षमता हवी. इतकं चालणार कोण ? दिवसाकाठी दहा मैल डोंगरकपारी तुडवणारा आदिवासी या कामाला योग्यच होता. पण शहरापासून बिचकून राहणारा हा लाजाळू माणूस गँगमन म्हणूनकाम करायलाकसा तयार झाला कुणास ठाऊक. […]

पुलाखालची माणसं (कथा)

ही पुलाखालची माणसं मुंबईच भयावह चित्रण आहेत. कुठेतरी वाळवी लागली आहे. बाकी सर्व प्रश्न सुटू शकतात पण एकदा लागलेली ही वाळवी शहर आतून-बाहेरून पोखरून काढणार. वर्षा-दोन वर्षापूर्वी पुलाखाली माणसं नव्हती. आता कुठल्याही पुलाखाली जाऊन पाहा. नशेत बुडालेल्या केविलवाण्या चेहऱ्यांची ही कळकट-मळकट मंडळी जनावराच्या नजरेन तुमच्याकडे पाहतील. […]

स्टेशन चिरेबंदी (कथा)

अस्ताव्यस्त पसरलेल्या या स्टेशनवर किती प्लॅटफॉर्म आहेत हे स्टेशनमास्तरला सुद्धा सांगता येणार नाही. किती पूल आहेत तेही मोजावे लागतील. कुठल्या पुलावर चढल्यावर कुठल्या प्लॅटफॉर्मवर उतरता येईल ? कुठे जाता येईल ? सांगता येणार नाही. कोण कुठे अडवील समजणार नाही. गर्दीत काहीही स्वत:च डोक न चालवता चालत राहिलात तरच स्टेशनच्या बाहेर पडू शकाल. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..