गढवालमधील पंचप्रयाग
केदारनाथहून येणारी, निळ्या रंगामुळे खुलणारी, शांत वाहणारी मंदाकिनी तर बद्रीनाथहून आदळत, आपटत खळाळत धावणारी अलकनंदा यांचे संगमस्थान म्हणजे ‘रूद्रप्रयाग’. या स्थानाचे उल्लेख स्कंदपुराण तसेच महाभारतात आले आहेत. श्रीशंकर पार्वतीमातेला सांगतात, “हे देवी, माझे तिसरे निवासस्थान रूद्रालय या नावाने प्रसिद्ध आहे. ते सर्व तीर्थांत उत्तम तीर्थ आहे. या स्थानाच्या स्मरणानेसुद्धा व्यक्ती सर्व पापातून मुक्त होते. […]