देवतात्मा हिमालय – भाग 1
सुमारे ५ अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सूर्याचा जन्म झाला व त्याचेच एक अपत्य म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वीसुद्धा सूर्यासारखीच लालभडक रसरसलेली होती. त्यावेळी पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप, वायुरूप असा सूर्याभोवती फिरणारा एक गोळा. काळ कुणासाठीच थांबत नाही. वर्षांमागून वर्षे सरत होती. पृथ्वीचा हा गोळा थंड होऊ लागला. पृथ्वी बाह्यतः थंड झाली. पण अंतरंगात मात्र धगधगत राहिली. पण थंड […]