नवीन लेखन...
Avatar
About प्रकाश पोहरे
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

विदर्भ विकासाची त्रीसूत्री

जेव्हा-जेव्हा विकासाबद्दल चर्चा होते, मग तो एखाद्या खेड्याचा असो अथवा एखाद्या देशाचा प्रत्येक वेळी उपलब्ध साधनसंपत्ती, दळणवळणाच्या सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांचाच प्रामुख्याने उल्लेख होतो. अर्थात विकासाच्या संदर्भात या सगळ््या गोष्टींचे महत्त्व नाकारता येत नाहीच; परंतु यापेक्षाही अधिक महत्त्वाची बाब म्हणजे विकासाची मानसिकता! ही मानसिकता असेल तर साधनसंपत्तीची उपलब्धता नसणे ही अडचण ठरत नाही आणि ही मानसिकता नसेल तर कितीही अनुकूल परिस्थिती असली तरी विकासाच्या केवळ गप्पाच होऊ शकतात.
[…]

क्षमतेचा ऱ्हास !

गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. अगदी आदिम अवस्थेत असल्यापासून माणूस त्या अर्थाने ‘गरजवंत’च होता. संरक्षण आणि उपजीविका या दोन गरजांनी माणसाला त्याच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा अधिक काहीतरी मिळविण्यासाठी प्रेरित केले.
[…]

अधिवेशन उत्तरासाठी,मोर्चाकरिता नव्हे !

नागपूरचे हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे अनेक प्रश्नांना अनुत्तरित ठेवून संपले. दरवर्षीची परंपरा याही वर्षी पाळल्या गेली. विदर्भाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा वार्षिक सोहळा यापलीकडे नागपूर अधिवेशनाला आता महत्त्व उरलेले नाही.
[…]

सर्व्हायवल ऑफ दी फिटेस्ट!

सजीवाच्या उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडताना डार्विनने ‘सर्व्हायवल ऑफ दी फिटेस्ट’ ही संकल्पना लोकांसमोर ठेवली होती. पृथ्वीवरील पर्यावरणीय, जैविक किंवा इतर बदलांना तोंड देण्याची क्षमता असलेले जीवच तग धरून राहू शकतात आणि या बदलांचा सामना करण्याची क्षमता नसलेले जीव कालांतराने नामशेष होतात अशी त्याची एकूण संकल्पना होती. डार्विनचा हा सिद्धान्त आज जगमान्य झाला आहे.
[…]

विदर्भाची ओळख कोणती?

मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी विदर्भ प्रदेश हा तत्कालीन सी.पी. अॅण्ड बेरार (मध्य प्रांत आणि वऱ्हाड) या प्रांताचा एक भाग होता.
[…]

कर्जमाफी कशाची,लुटलेले परत करा!

मोहन धारियांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमुत्त*ीसाठी नुकतेच आंदोलन करण्यात आले. कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुत्त*ी मिळावी, ही या आंदोलनातील एक ठळक मागणी होती. इतरही काही मागण्या होत्या आणि त्या सगळ्या मागण्यांचा उद्देश एकच होता, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या दुर्दैवी आत्महत्या रोखणे.
[…]

आता लढा सुरू झालाय!

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मोहन धारिया यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या निकराच्या लढ्यात प्रकाश पोहरे त्यांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय सहभागी झाले आहेत. त्यामुळे दर रविवारी प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या ‘प्रहार’ या स्तंभासाठी ते यावेळी वेळ देऊ शकले नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी दि. […]

स्वप्न आणि वास्तव

भा रताला जागतिक महासत्ता बनवायचे आहे. मुदत आहे 2020 पर्यंतची. तसा चंगच आपल्या नेत्यांनी बांधला आहे.
[…]

स्वातंत्र्य कुणासाठी

धंद्यापेक्षा सामाजिक बांधीलकीशी वचनबद्ध असलेल्या देशोन्नतीसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ बातम्यांचा विषय कधीच नव्हता. त्यामुळेच विदर्भ किंवा मराठवाड्यात शेतकऱ्यांची आत्महत्या ही बातमीही नव्हती अगदी तेव्हापासून शेतकऱ्यांसमोर मांडून ठेवलेल्या संभाव्य संकटाची जाणीव होऊन ‘देशोन्नती’ने या प्रश्नावर जनजागरण करायला सुरुवात केली होती. मी स्वत: देशोन्नतीच्या माध्यमातून आणि व्यत्ति*श: या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करीत होतो.
[…]

संवेदनशीलता

दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, परंतु स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, अशा स्वरूपाचा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. आपल्या सरकारला, राजकारण्यांना हा वाक्प्रचार चपखलपणे लागू पडतो. स्वत:च्या बुडाखाली काय जळत आहे याची त्यांना अजिबात कल्पना नाही.
[…]

1 22 23 24 25 26 44
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..